"श्राद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ७९:
==श्राद्धासाठी भारतातील काही खास तीर्थ क्षेत्रे==
* गया (बिहार): हे फल्गु नदीच्या किनारी आहे. येथे श्राद्ध केल्यास परत कधीही करावे लागत नाही. या तीर्थाचे वर्णन [[रामायण|रामायणातही]] आहे.
* पिंडारक (गुजरात) : हे ठिकाण [[द्वारका]]पासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे. येथे एक सरोवर है, त्यामध्ये यात्रेकरू श्राद्ध करून पिंड सरोवरात टाकतात. जर पिंड तरंगले, तर ज्याचे श्राद्ध केले तो नक्की स्वर्गास गेला असे समजले जाते. या ठिकाणी श्रीवल्लभाचार्य महाप्रभूंची बैठक आहे. असे म्हणतात की येथे महर्षी दुर्वासांचा आश्रम होता. महाभारत युद्धानंतर पांडव सर्व तीर्थांमध्ये आपल्या मृत बांधवांचे श्राद्ध करायला आले होते, त्यांपौकी हे एक ठिकाण. भोपालका नावाच्या रेल्वे स्टेशनवरून पिंडारकासाठी बसेस मिळतात.
* प्रयाग (उत्तर प्रदेश) : ज्या व्यक्तीचे श्राद्ध येथे होते ती जन्म-मरणांच्या फेऱ्यांतून मुक्त होते.
* ब्रह्मकपाल ([[उत्तराखंड]]) : हे स्थान [[बद्रीनाथ]]च्या जवळ आहे. येथे श्राद्ध केल्यावर परत कोणतेही श्राद्ध करावयाची गरज नसते.
* मेघंकर ([[महाराष्ट्र]]) : या तीर्थाला भगवान जनार्दनाचे स्वरूप मानले गेले आहे. ज्या व्यक्तीचे श्राद्ध येथे होते त्याचे सर्व पाप नष्ट होते, असे सांगितले जाते. हे गांव [[खामगांव]]पासून सुमारे ७५ किलोमीटर अंतरावर आहे. या तीर्थाचे वर्णन ब्रह्मपुराण, पद्मपुराण आदी धर्मग्रंथांमध्ये आले आहे. हे ठिकाण [[पैनगंगा नदी]]च्या किनाऱ्यावर आहे.
* लक्ष्मणबाण ([[कर्नाटक]]) : पौराणिक समजुतीनुसार सीताहरणाच्या प्रसंगानंतर [[राम]]-[[लक्ष्मण]]
* लोहागढ (राजस्थान) : या स्थानाचे रक्षण स्वयं ब्रह्मदेव करतात, असे सांगितले जाते. येथे ज्या व्यक्तीचे श्राद्ध होते ती हमखास स्वर्गास जाते. पांडवांची शस्त्रे येथे गळून पडली होती, म्हणून या स्थानाला लोहार्गल नाव पटले. लोहागढ हा लोहार्गलचा अपभ्रंश. पश्चिम रेल्वेची एक लाईन राजस्थानातील सवाई माधोपुर से लोहारूपरयंत जाते. या लाईन पर सीकर किंवा या नवलगढ स्टेशन पासून लोहागढ जवळ आहे.
* सिद्धनाथ ([[मध्य प्रदेश]]): हे स्थान [[उज्जैन]]मध्ये [[क्षिप्रा नदी]]च्या किनारी आहे. येथे दर महिन्याच्या कृष्ण [[चतुर्दशी]]ला आणि [[पितृपक्ष|पितृपक्षात]] दरदिवशी श्राद्ध करतात. असे म्हणतात की येथे श्राद्ध करणे फक्त सिद्ध योग्यांच्याच नशिबी असते.
|