"डेव्हिड लिव्हिंगस्टन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ५९:
लिव्हिंगस्टनच्या मनात आफ्रिकन लोकांबद्दल अपार सहानुभूती असल्याने तो त्यांच्यामध्ये सहज मिसळून गेला. त्याचे औषधोपचार आणि त्याची गोड वागणूक त्याला, मनात कोणतेही भय न बाळगता आफ्रिकेच्या दाट जंगलांत वसलेल्या जंगली माणसांच्या टोळ्यांपर्यंत पोचायला मदतरूप झाली. तेथे अशीच माणसे होती की ज्यांनी कधी गोरा माणूस पाहिला नव्हता. रोगराई तर अफाट होती. लिव्हिंगस्टनला स्वतःलाच ३१वेळा मलेरिया झाला, पण त्याच्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून त्याने स्वतःचे आणि अनेक आफ्रिकन लोकांचे प्राण वाचवले.
लिव्हिंगस्टनने केप ऑफ गुड होप (केप काॅलनी) पासून ते विषुववृत्तापर्यंत आणि अटलांटिक महासागरापासून ते हिंदी महासागरापर्यंत फिरून त्या भूभागाचा नकाशा बनवला. हल्ली व्हिक्टोरिया फाॅल्स म्हणून ओळखला जातो तो (झांबेजी नदीचा) विशाल धबधबा
सोळा
==पुन्हा आफ्रिका==
थोड्या काळानंतर लिव्हिंगस्टन परत आफ्रिकेत आला. यावेळी त्याने पूर्व आणि मध्य आफ्रिकेमधून झांबेजी नदीच्या किनाऱ्याने चालायला सुरुवात केली. या प्रवासात त्याला न्यासा तलावाच्या अस्तित्वाचा शोध लागला. १८६६ साली त्याने नील नदीच्या काठाकाठाने हिंडायला सुरुवात केली. परंतु काही खास हाती लागायच्या आतच डेव्हिड आजारी पडला व त्याला टांगानिका सरोवराच्या किनाऱ्यावर असलेल्या उजीजी गावात आसरा घ्यावा लागला. या आजारपणात लिव्हिंगस्टनचा आणि उर्वरित जगाचा संपर्क तुटला.
अशीच चार वर्षे गेली. डेव्हिड लिव्हिंगस्टन बरा झाला, आणि त्याने परत नवीन मुलूख शोधायला प्रारंभ केला. अमेरिकेच्या [[न्यूयाॅर्क]] शहरातील एक धाडसी पत्रकार, हेनरी स्टॅनली, डेव्हिडला शोधत आफ्रिकेत आला आणि त्यांची भेट झाली. १८७१ साली [[झांजीबार]]मधल्या जवळपास २०० लोकांच्या साथीने हे दोघे आफ्रिकेच्या अंतर्भागात घुसले आणि त्यांनी सतत नऊ महिने जंगलभ्रमण केले. स्टॅनलेने आजारी लिव्हिंगस्टनला इंग्लंडला परतायचा सल्ला दिला, पण त्याने तो मानला नाही. डेव्हिडला नील नदीच्या उगमाचा शोध लावायचा होता. स्टॅनलेनेनी आणलेली औषधे आणि पौष्टिक खाद्यपदार्थ आणि अन्य सामग्रीच्या बळावर त्याने आपला प्रवास चालूच ठेवला.
हेनरी स्टॅनले आपल्या देशाला परतला आणि त्याच सुमारास डेव्हिडला एक नदीचा उगम सापडला. पण ती नदी नील नदी नसून काँगो नदी (झायरे नदी) होती. परंतु तिची अधिक माहिती मिळविण्यापूर्वीच, तिच्या काठाने हिंडताना डेव्हिड लिव्हिंगस्डनचे १ मे १९७३ रोजी निधन झाले. स्थानिक लोकांनी त्याच्या शरीराला मसाले चोळून ते सडू दिले नाही. आफ्रिकेच्या अंतर्भागातून हजारो आफ्रिकन त्याच्या प्रेताबरोबर चालतचालत झांजीबारला आले व त्यांनी त्याला शेवटची मानवंदना दिली. अखेर त्याचे शव झांजीबारमार्गे ११ महिन्यांनी, १८ एप्रिल १८७४ रोजी, इंग्लंडला पोचले आणि तेथे त्याचा रीतसर अत्यसंस्कार झाला.
डेव्हिड लिव्हिंगस्टनच्या स्मरणार्थ [[झांबिया]] देशातील एका शहराला लिव्हिंगस्टन हे नाव दिले गेले. [[स्काॅटलंड]]ने दहा पौंडाच्या चलनी नोटेवर त्याचा फोटो छापला. [[ब्रिटन]], [[झांबिया]], [[बुरुंडी]], [[झिंबाब्वे]] यांच्यासह अनेक देशांनी त्याचे चित्र असलेली टपाल तिकिटे छापली.
डेव्हिड लिव्हिंगस्टनने शोधलेल्या आफ्रिका खंडाच्या प्रदेशांची झलक अमेरिकन पत्रकार हेनरी स्टॅनलेच्या 'थ्रू द डार्क काॅन्टिनेन्ट' या पुस्तकातून वाचता येते.
▲सोळा सालच्या भटकंतीनंतर जेव्हा डेव्हिड लिव्हिंगस्टन [[लंडन]]ला परतला तेव्हा संपूर्ण राष्ट्राने त्याचा सत्कार केला.
(अपूर्ण)
|