"कबीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
[[भारत|भारतात]] जन्मलेले संत [[कबीर]] यांचा धर्म काय होता, याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. कबीर हे मानवजातीचे, मानवतेचे पुजारी होते. कुठल्याही प्रकारचा धर्मभेद, पंथभेद, जातिभेद यापलीकडे कबीर पोहोचले होते. या भारत देशातील यच्चयावत समाज एकमताने चालावा, एकजुटीने वागावा म्हणून ज्या महापुरुषांनी आटोकाट प्रयत्न केले, सर्व सुखी असावेत अशा विचाराने जे आमरण झटले त्यापैकी कबीर हे एक होत. त्यामुळे त्यांना हे हिंदू-मुसलमान ऐक्याचे प्रतीक समजले जाते. कबीरांनी केलेली [[राम]], [[कृष्ण]], [[विठ्ठल]] अशा अनेक हिंदू दैवतांवरील पदे उपलब्ध आहेत. कबीर सर्व धर्मांच्या कुंपणापलीकडे असलेल्या परब्रह्मस्वरूप परमेश्वराला जाणत होते आणि त्याबरोबरच हे सर्व जग चालविणारा जो परमेश्वर आहे, या सर्व जगाच्या निर्मितीमागे, या सर्व जगाच्या व्यवहारामागे ज्याची प्रचंड शक्ती उभी आहे तो ईश्वर, तो परब्रह्मस्वरूप पांडुरंग निर्गुण, निराकार आहे, हा त्यांचा विश्वास होता. त्याच्या म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाला कुठलेच बंधन मर्यादित ठेवू शकत नाही. म्हणूनच कबीरांच्या दृष्टीने सगळे साधुसंत, सगळे देव हे त्या एकाच परब्रह्मस्वरुप [[विठ्ठल|विठ्ठलाची]] लेकरे आहेत.संत रविदास कबिरांना मोठा भाऊ मानत असत.{{संदर्भ हवा}}
 
हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ [[पौर्णिमा|पौर्णिमेला]] कबीर जयंती असते.
 
भारत सरकारने १९५२ साली कबीर यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले होते.
Line ३५ ⟶ ३७:
त्यांच्या जन्माविषयी परंपरागत कथा सांगितली जाते ती अशी -
 
ज्येष्ठ पौर्णिमेस एका ब्राह्मण विधवेच्या पोटी एक पुत्र जन्मला पण उजळ माथ्याने त्याचे पालनपोषण करणे शक्य नाही म्हणून तिने काशीतील एका सरोवराच्या ( लहरतारा ) काठी त्याला टाकून दिले. कर्मधर्म संयोगाने काशीतल्या एका मुस्लिम जोडप्याला तो सापडतो.  त्या मुस्लिम जोडप्यांचे नाव निरू व निमा असते. तेत्यांनी त्या मुलाचे चांगले पालनपोषण करतातकेले आणि पुढे हाच मुलगा कबीर या नावाने प्रसिद्ध झाला.
 
कबीर जरी मुस्लिम कुटूंबात रहात होते तरी ते रामाचे उपासक होते. संत कबीर यांच्या बद्दलची कोणतीही ठाम महिती नाही पण असे म्हणतात कि त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पत्नीचे नाव लोई असे होते व त्यांना एक कमाल नावाचा मुलगा  आणि कमाली नावाची एक मुलगी होती.
 
कबीर हे काशीत विणकर म्हणून काम करत होते. ते आयुष्यभर काशीमध्येच राहिला पण त्याचात्यांचा मृत्यू काशीत नसून मगहर येथे झाला, हे स्वतःच त्यांनी सांगितले आहे.
 
"सकल जनम शिवपुरी गंवाया।
"https://mr.wikipedia.org/wiki/कबीर" पासून हुडकले