"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५३:
 
===[[तिथी]]चा क्षय व वृद्धी===
पंचांगात एखादी [[तिथी]] पाठोपाठच्या दोन सूर्योदयांच्या वेळी आलेली असते तर एखाद्या [[तिथी]] कोणत्याच सूर्योदयाच्या वेळी नसते. याचे कारण [[चंद्र]] व [[पृथ्वी]] यांची परस्परावलंबी सापेक्ष गती. ही कधी थोडी कमी तर कधी थोडी जास्त असते. सूर्योदयाच्या वेळी जी [[तिथी]] असते ती त्या दिवसाची [[तिथी]]म्हणून पंचांगात दिलेली असते. एखादी [[तिथी]] सूर्योदयानंतर चालू होते व दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापूर्वी संपते. त्यामुळे त्या [[तिथी]]चा [[क्षय]] झाला असे समजतात. [[तिथी]]चा क्षय म्हणजे ती [[तिथI]] आलीच नाही असा होत नाही. प्रत्येक [[तिथी]] १९ ते २६ तासांकरता येतेच. (तिथिलोपाचे उदाहरण : रविवारी ६:३२ ला सूर्योदय. तेव्हा नवमी आहे, म्हणून त्या पूर्ण दिवसाची नवमीशी सांगड. मग ६:५० ला दशमी सुरू होते, आणि ती सोमवारी पहाटे ५:१० ला संपून एकादशी सुरू होते. सोमवारी ६:३४ ला सूर्योदय होतो, तेव्हा एकादशी. अशा प्रकारे दशमीचा क्षय वा लोप होतो.) तर कधीकधी, एका सूर्योदयाला चालू असलेली [[तिथी]] दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयानंतरच संपते, त्यामुळे ती [[तिथी]] पंचांगात लागोपाठ दोन दिवशी दाखवावी लागल्याने तिची वृद्धी झाली असे म्हटले जाते. वृद्धीचे उदाहरण : रविवारी पहाटे ५:४२ अष्टमीची सुरुवात, आणि ६:०८ चा सूर्योदय. सोमवारी ६:०९ चा सूर्योदय, तेव्हा अष्टमी, म्हणून त्या पूर्ण दिवसाची सागड परत अष्टमीशीच. सोमवारी सूर्योदयानंतर ७:१५ ला अष्टमी समाप्त. म्हणजे अष्टमी लागॊपाठ दोन दिवस आली, म्हणजे तिची वृद्धी झाली. चन्द्राच्या पृथ्वीपासून कमी-अधिक अन्तरानुसार केपलरच्या सूत्रानुसार (Kepler's Law) तिथीचा काल १९ ते २६ तास असल्यामुळे या घटना घडतात. एका रोमन तारखेला तीन तिथ्या येऊ शकतात, अनेकदा येतात. आणि एका [[तिथी]]ला तीन तारखा शक्य असतात, आणि अनेकदा हा प्रकारही होतो.
 
===तिथिवासर===
एकादशी हा अनेकांचा उपासाचा दिवस असतो. हा उपवास द्वादशीला सोडतात. परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा चौथा भाग (तिथिवासर/हरिवासर) येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असे शास्त्र सांगते. हा तिथिवासराचा काळ संपल्यानंतरच उपास सोडतात. हा काळ पंचांगात दिलेला असतो.
 
सूर्योदयापूर्वीच तिथिवासर संपले असेल तर पंचांगात तसे लिहिण्याची गरज नसते. अश्यावेळी सूर्योदयानंर केव्हाही उपवास सोडता येतो.
 
==वार==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले