"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →अन्य योग |
|||
ओळ ६७:
==[[नक्षत्र]]==
नक्षत्रे आणि राशी म्हणजे अवकाशातील विशिष्ट पट्ट्यातील ठळक तारका समूह. [[सूर्य (ज्योतिष)|सूर्य]], [[चंद्र (ज्योतिष)|चंद्र]] आणि ग्रह आकाशातून ज्या पट्ट्यातून फिरत फिरत पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात त्या पूर्ण पट्ट्याचे ३६० अंश कल्पून त्या मार्गाचे ३०-३० अंशाचे बारा भाग पाडलेले असतात. त्या एका भागाला रास किंवा [[राशी]] म्हणतात. तसे २७ भाग पाडले तर प्रत्येक भागात एक अशी २७ [[नक्षत्र|नक्षत्रे]] होतात. म्हणजे एक भाग हा १३ अंश २० कलांचा होतो. ही नक्षत्रे म्हणजे अवकाशातील विशिष्ट तारका अथवा तारकासमूह. त्यातील एका ठळक ताऱ्याला त्या नक्षत्राचा योगतारा म्हणतात. सव्वा दोन नक्षत्रांची एक राशी होते. प्रत्येक नक्षत्राचे चार पाद (चरण) असतात. नऊ पाद मिळून एक रास होते.
बृहत्संहितेत नक्षत्रांचे त्यांच्या गुणांवरून ध्रुव, तीक्ष्ण, चर, मृदु, लघु, उग्र व मृदुतीक्ष्ण असे ७ गट पाडले आहेत. यांशिवाय अधोमुख, ऊर्ध्वमुख, तिर्यङ्मुख, अंध, मंदाक्ष, मध्याक्ष व सुलोचन असेही नक्षत्रांचे प्रकार मानले आहेत.
ओळ ७३:
मृग, चित्रा आणि घनिष्ठा या नक्षत्रांना द्विपाद नक्षत्रे म्हणतात. भद्रा तिथीला यांपैकी एखादे नक्षत्र असेल तर द्विपुष्कर योग होतो. द्विपाद नक्षत्राचे दोन पाय एका राशीत आणि उरलेले दोन पाय पुढल्या राशीत असतात.
==रास, नक्षत्रे आणि त्यांचे चरण==
एका राशीत नऊ नक्षत्र-चरणे येतात. एका राशीत ३० अंश असतात. अश्या बारा राशी आहेत. एका नक्षत्रात चार चरणे येतात.
( एक नक्षत्र = ४चरण = ६०अंश या घटी।)
मेष = अश्विनीचे ४ चरण, भरणीचे ४ आणि कृत्तिकाचा पहिला चरण.
वृषभ = कृत्तिकाचे शेवटचे ३ चरण, रोहिणीचे ४ चरण आणि मृग नक्षत्राचे पहिले दोन चरण.
मिथुन = मृग नक्षत्राचे मागले २ चरण, आर्द्राचे ४ चरण आणि पुनर्वसूचे पहिले ३ चरण.
कर्क = पुनर्वसूचा चौथा चरण, पुष्यचे ४ चरण आणि आश्लेषाचे ४ चरण.
सिंह = मघाचे ४ चरण, पूर्वाफाल्गुनीचे ४ चरण आणि उत्तराफाल्गुनीचा पहिला चरण.
कन्या = उत्तराफाल्गुनीचे उरलेले ३ चरण, हस्त नक्षत्राचे ४ चरण आणि चित्राचे पहिले २ चरण.
तुला = चित्राचे बाकीचे २ चरण, स्वातीचे ४ चरण आणि विशाखा नक्षत्राचे पहिले तीन चरण.
वृश्चिक = विशाखाचा चौथा पाद, अनुराधाचे ४ आणि ज्येष्ठा नक्षत्राचे चारही ४ चरण.
धनु = मूळ नक्षत्राचे ४ चरण, पूर्वाषाढाचे ४ आणि उत्तराषाढाचा पहिला चरण.
मकर = उत्तराषाढाचा दुसरा, तिसरा आणि चौथा पाद, श्रवण नक्षत्राचे ४ आणि धनिष्ठाचे पहिले दोन पाद.
कुंभ = धनिष्ठाचे मागचे २ चरण, शततारकाचे ४ चरण आणि पूर्वाभाद्रपदा नक्षत्राचे पहिले तीन चरण.
मीन = पूर्वाभाद्रपदाचा चौथा, उत्तराभाद्रपदाचे ४ आणि रेवती नक्षत्राचे ४ चरण.
(अभिजित नावाचे फक्त १९ घटी असलेले २८वे नक्षत्र, उत्तराषाढाच्या शेवटच्या १५घटी आणि श्रवण नक्षत्राच्या सुरुवातीच्या ४घटी मिळून बनते असे मानले गेले आहे. अभिजितचे चारही चरण मकर राशीत असल्याचे सांगितले जाते. एक घटी म्हणजे नक्षत्राचा साठावा भाग.)
==योग==
|