"बालकुमार साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ४४:
==अन्य बालकुमार साहित्य संमेलने==
* [[उचगाव]] येथील मळेकरणी सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित पहिले बालकुमार साहित्य संमेलन दि.१९-१२-२०१३ रोजी झाले. संमेलनापूर्वी मळेकरणी देवीची पूजा करून तिच्या आमराईत इंजिनियर आर. एम. चौगुले आणि माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले होते. संमेलनाध्यक्ष मळेकरणी सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष जवाहर देसाई होते.
* [[सिंधुदुर्ग]] जिल्ह्यातील बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने पिकुळे (ता. [[दोडामार्ग]]) येथे ७ जानेवारी २०१४ला एक बालकुमार साहित्य संमेलन झाले. हे जिल्हास्तरीय संमेलन होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी बालसाहित्यकार सुभाष कवडे होते. एक हजार शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, कोकणातील बालसाहित्यिक आदींचा या बालकुमार साहित्य संमेलनात सहभाग होता. संमेलनात काव्यवाचन, बालकुमार कथाकथन, परिसंवाद, सत्कार सोहळा, ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन आदी उपक्रम झाले. हे संमेलन दर वर्षी होते.
* [[लोणावळा]] गावात मनःशक्ती प्रयोग आणि [[मसाप]] यांच्यातर्फे २० सप्टेंबर २०१७ रोजी एक तथाकथित पहिले बालकुमार साहित्य संमेलन भरले होते. डॉ. [[अनिल अवचट]] संमेलनाध्यक्ष होते.
* [[मुलांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] नावाचे एक (पहिले) मराठी साहित्य संमेलन २००२ साली भरले होते. डॉ. [[मधुसूदन घाणेकर]] हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी शाखेतर्फे मोहननगर- चिंचवड येथील श्री '''शिवछत्रपती शिवाजीराजे''' माध्यमिक विद्यालयात ११-११-२०१७ रोजी बालकुमार साहित्य संमेलन झाले. लक्ष फाउंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई संमेलनाध्यक्ष होत्या.
* मुंबईतील चेंबूरमध्ये २९ नोव्हेंबर २०१७ रोजी एक बालकुमार साहित्य संमेलन झाले. मुंबई मराठी साहित्य संघ आणि चेंबूरमधील स्वामी मुक्तानंद हायस्स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बालसाहित्यिक [[ल.म. कडू]] होते.
* पहिले सिंदफणा बालकुमार मराठी साहित्य संमेलन वडाळी येथे झाले.
* २रे सिंदफणा बालकुमार मराठी साहित्य संमेलन शिरूर कासार येथे झाले.
* ३रे सिंदफणा बालकुमार मराठी साहित्य संमेलन तागडगाव येथे १७ ते १८-१-२०१७ या काळात झाले.
* ४थे : सिंदफणा बालकुमार मराठी साहित्य संमेलन शिरूर कासार येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत १७ ते १८ जानेवारी २०१८ या काळात झाले. हे तेथे भरणारे चौथे संमेलन असून डॉ. सतीश साळुंके हे त्याचे संमेलनाध्यक्ष होते.
* वसई माणिकपूर येथील सहकार शिक्षण संस्थेच्या विद्यमाने शुक्रवार १४ डिसेंबर २०१२ रोजी वनमाळी विद्यासंकुलातील जी.जे. वर्तक विद्यालय येथे 'पाचवे बालकुमार मराठी साहित्य संमेलन' आयोजित करण्यात आले होते. या मराठी साहित्य संमेलनास वसई - विरार शहर महापालिकेने ७५ हजार इतके अनुदान दिले होते.
* [[वसई माणिकपूर]] येथील सहकार शिक्षण संस्था व वसई-विरार शहर पालिकेच्या वतीने सहावे एकदिवसीय बालकुमार मराठी साहित्य संमेलन २० डिसेंबर २०१३ रोजी वसई रोड (पश्चिम) येथील वर्तक विद्यालयात झाले. नगरपालिकेने या संमेलनास एक लाखाचे अनुदान दिले होते. संमेलनात, तालुक्यातील मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील, तसेच जिल्हा परिषद शाळांमधील पालक, विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
* वसई-विरार शहर महापालिकेच्या सहकार्याने वसई रोड येथील सहकार शिक्षण संस्थेने सातवे बालकुमार मराठी साहित्य संमेलन वसईत आयोजित केले.. वसई रोड पश्चिम आनंद नगर येथील वनमाळी विद्यासंकुलातील जी. जे. वर्तक विद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवार १२ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७.३० च्या कालावधीत ७ वे बालकुमार मराठी साहित्य संमेलन झाले.
* अकोला : येथे २-३ डिसेंबर २०१७ या कालावधीत दोन दिवसीय ५वे राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन झाले.ज्येष्ठ बाल साहित्यिक शंकर कऱ्हाडे अध्यक्ष होते.
==बाह्य दुवे==
|