"महिला साहित्य संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
साचा |
|||
ओळ २९:
‘पद्मगंधा प्रतिष्ठान’ ही पश्चिम नागपुरातील एक तडफदार अशी संस्था आहे. साहित्यांत अनेकांना मानाचे स्थान प्राप्त करून देण्यात ही संस्था अग्रेसर आहे. मुख्य म्हणजे या संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजे १९९४ पासून, स्थापनेला वीस वर्षे पूर्ण व्हायच्या आत अनेक लेखक व अनेक लेखिकांना वाङ्मयप्रकारात लिखाणाची, काव्य करण्याची, नाटकांत लेखिका, दिग्दर्शक व रंगकर्मी म्हणून नाव कमावण्याची संधी दिली. ही संस्था पुरुष आणि स्त्रिया सर्वांसाठी खुली आहे. संस्था रजिस्टर्ड असली, तरी कुठलीही शासकीय मदत संस्थेला नाही. सुप्रसिद्ध लेखिका शुभांगी भडभडे या संस्थेच्या अध्यक्ष(इ.स. २०१३) आहेत.
संस्थेतर्फे व्याख्यानमाला, संगीतसमारोह, युवा पिढीचे व महिलांचे एकत्र कविसंमेलन कुठल्यातरी निसर्गरम्य स्थळी होत असते. पुस्तकचर्चा, साहित्यिकांशी सुसंवाद, परिसंवाद आणि मुख्य म्हणजे तीन दिवसांचा लेखिका नाट्यमहोत्सव. सतत
जीवनगौरव पुरस्कार - समाजासाठी झटणाऱ्या नामवंत, राष्ट्रासाठी वेगळे काहीतरी करणाऱ्या मराठी व्यक्तीला हा ’पद्मगंधा प्रतिष्ठान’तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत आठ मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराशिवाय ’स्त्रीशक्ती पुरस्कार’ही देण्यात येतो. वेगवेगळ्या साहित्यप्रकारांच्या स्पर्धा येथे होतात व सर्व प्रकारच्या लेखक-लेखिकांना त्यामुळे लिखाण करण्यास उत्तेजन मिळते.
या प्रतिष्ठानच्या २०१३सालच्या उपाध्यक्ष- विजया ब्राह्मणकर , विजया मारोतकर, कार्याध्यक्ष- संध्या कुळकर्णी, कोषाध्यक्ष- परिणिता कवळेकर, सचिव- वीणा कुळकर्णी, सहसचिव- स्मृती देशपांडे, नाट्यसमिती प्रमुख- प्रतिभा कुळकर्णी, माला केकतपुरे, संध्या कुळकर्णी, श्यामकांत कुळकर्णी, वसुधा पांडे, छाया कावळे आणि सुचित्रा कातरकर आहेत. शिवाय इतर अनेक साहाय्यक आहेत. प्रत्येक जण आपला आपला विभाग उत्तम रीतीने सांभाळतो. रमेश मेंडुले, देवीदास इंदापवार, वसंतराव दहासहस्र या सर्वांची मदत आहेच. संस्थेचे मराठी साहित्य संमेलन २००६ मध्ये व बालसाहित्य संमेलन २००८ मध्ये भरले होते. ‘पद्मगंधा प्रतिष्ठान’ ही संस्था साहित्यक्षेत्रात अनेक स्त्रियांना मार्गदर्शन करणारी ठरली, यात शंका नाही. परंतु, ही संस्था फक्त स्त्रियांसाठी नाही, तर पुरुषांनाही अनेक विषयांत मार्गदर्शन करणारी ठरली आहे, साहित्यक्षेत्रात वाव देते आहे.
पद्मगंधा प्रतिष्ठान ही संस्था साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी लेखकांना पुरस्कार देते. त्या पुरस्कारांपैकी काही पुरस्कार असे : -
* डाॅ. कुसुमावती खोत आणि पद्मगंधा प्रतिष्ठान नाट्यलेखन पुरस्कार
* डाॅ. छाया कावळे पुरस्कार
* जीवनगौरव पुरस्कार
* कै. मंदाकिनी लोही समीक्षा पुरस्कार
* विमलताई देशमुख ललितलेखन पुरस्कार
* सुधाकुसुम कादंबरी पुरस्कार, वगैरे.
=== भगिनी मंडळ===
|