"ग्रहण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
थोरवे सोनल (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
ग्रहण म्हणजे अवकाशात घडणारा प्रकाश-सावलीचा खेळ. जेव्हा एका खगोलीय वस्तूची सावली दुसऱ्या खगोलीय वस्तूवर पडते, किंवा एक खगॊलीय वस्तू दुसऱ्या खगोलीय वस्तूच्या दृष्टिआड येते, तेव्हा पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूला '''ग्रहण''' लावले असे म्हटले जाते.
ग्रहणाचे साधारण तीन प्रकार आहेत:
ओळ १३:
[[Image:NSRW Solar Eclipse.png|thumb|150px|right|सूर्यग्रहण]]
जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे साधारण सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते. जेव्हा [[सूर्य]] आणि [[पृथ्वी]]च्या मध्ये [[चंद्र]] येतो तेव्हा
=== खग्रास सूर्यग्रहण ===
खग्रास म्हणजे पूर्ण ग्रासणे. पृथ्वीवरून पाहता चंद्र आणि सूर्य यांचे कोनीय माप साधारण सारखेच असल्यामुळे चंद्र आणि सूर्य
▲खग्रास म्हणजे पूर्ण ग्रासणे. पृथ्वीवरून पाहता चंद्र आणि सूर्य यांचे कोनीय माप साधारण सारखेच असल्यामुळे चंद्र आणि सूर्य यांचा आकार आपल्याला एकसारखाच दिसतो. यामुळे जेव्हा चंद्र सरळ रेषेत पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, तेव्हा पृथ्वीवरून पाहता तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकतो. या वेळी [[सूर्य]] पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो; या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. चंद्र मध्ये आल्याने पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश अडविला जाऊन तेथे चंद्राची गडद सावली (प्रच्छाया) पडते. पृथ्वीवरील गडद सावलीच्या भागांतूनच खग्रास सूर्यग्रहण दिसू शकते.
==== तेजोवलय (Corona) ====
खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस, सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या भोवती वर्तुळाकार प्रखर किरणे दिसतात. याला तेजोवलय असे म्हणतात. हे तेजोवलय म्हणजे एरवी आपणांस न दिसू शकणारे, सूर्याच्या दृश्य पृष्ठभागाबाहेरील अति-तप्त असे आवरण असते.
=== खंडग्रास सूर्यग्रहण ===
खंडग्रास म्हणजे काही भाग ग्रासणे. सूर्य हा आपल्याला जवळचा तारा असल्याने तो विस्तारित
▲खंडग्रास म्हणजे काही भाग ग्रासणे. सूर्य हा आपल्याला जवळचा तारा असल्याने तो विस्तारित प्रकाशस्त्रोत आहे. चंद्र मध्ये आल्याने पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश अडविला जाऊन जशी चंद्राची गडद सावली (प्रच्छाया) तयार होते, तशीच विस्तारित प्रकाशस्त्रोतामुळे प्रच्छायेभोवती फिकट सावली (उपच्छाया) देखील पडते. उपच्छायेमुळे खंडग्रास सूर्यग्रहण दिसते.
खंडग्रास सूर्यग्रहणामागे दोन कारणे असू शकतात.
Line ३३ ⟶ ३०:
===कंकणाकृती सूर्यग्रहण===
चंद्राची पृथ्वीभोवतालची कक्षा थोडी
सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक असल्याने ग्रहणाचे चष्मे लावूनच, किंवा सूर्यबिंबाचे आरसा वापरून प्रतिबंबाचे भिंत किंवा पडद्यावर प्रक्षेपण
▲चंद्राची पृथ्वीभोवतालची कक्षा थोडी लम्बवर्तुळाकार असल्याने, चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर हे सतत थोड्याफार प्रमाणात बदलत असते. याचा परिणाम म्हणून चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा आकारही (कोनीय माप) बदलत असतो. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर जास्त असताना चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांमध्ये एका रेषेत आल्यास चंद्राचे कोनीय माप हे सूर्यापेक्षा लहान झाल्याने सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही. त्यामुळे चंद्रामागे झाकल्या गेलेल्या सूर्यबिंबाचा आकार बांगडीसारखा दिसतो. या स्थितीला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.
▲सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक असल्याने ग्रहणाचे चष्मे लावूनच, किंवा सूर्यबिंबाचे आरसा वापरून भिंत किंवा पडद्यावर प्रक्षेपण करून पाहणे निर्धोक असते.
== चंद्रग्रहण ==
{{मुख्य लेख|चंद्रग्रहण}}
जेव्हा [[पृथ्वी]], [[सूर्य]] आणि [[चंद्र|चंद्राच्या]] मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने [[चंद्रग्रहण]] दिसते. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी म्हणजेच चंद्राची पौर्णिमा ही स्थिती असते. [[चंद्रग्रहण]] हे [[पौर्णिमा|पौर्णिमेलाच]] दिसते. चंद्रग्रहणात आपण चंद्रावर पडलेली सावलीच पहात असल्याने पृथ्वीच्या ज्या भागातून दिसते त्या भागातून हे एकाच वेळी आणि एकसारखेच दिसते.
=== खग्रास चंद्रग्रहण ===
Line ५२ ⟶ ४८:
== अधिक्रमण ==
जेव्हा एखादी लहान कोनीय माप (म्हणजेच
बुधाची अधिक्रमणे ही साधारण एका शतकात १३ ते १४ वेळा दिसू शकतात. इ. स. २०१६ मध्ये ०९ मे ला बुधाचे अधिक्रमण पृथ्वीवरील काही
▲जेव्हा एखादी लहान कोनीय माप (म्हणजेच लहान भासमान आकार) असलेली खगोलीय वस्तू (जसे बुध ग्रह) मोठे कोनीय माप असलेल्या (जसे सूर्य) खगोलीय वस्तूच्या व पृथ्वीच्या मध्ये येते, तेव्हा दिसणाऱ्या घटनेला अधिक्रमण असे म्हणतात. आपल्याला पृथ्वीवरून [[बुध ग्रह|बुध]] व [[शुक्र]] यांची सूर्यावरील अधिक्रमणे दिसतात. अधिक्रमणामध्ये बुध किंवा शुक्र यांचे गडद व बिंदुवत बिंब एका काळ्या ठिबक्याप्रमाणे सूर्याच्या तेजस्वी बिम्बासमोरून जाताना दिसते.
सूर्यग्रहणाप्रमाणेच अधिक्रमण पाहताना देखील डोळ्यांची योग्य काळजी घेऊन योग्य उपकरणे वापरून निरीक्षण
▲बुधाची अधिक्रमणे ही साधारण एका शतकात १३ ते १४ वेळा दिसू शकतात. इ. स. २०१६ मध्ये ०९ मे ला बुधाचे अधिक्रमण पृथ्वीवरील काही ठिकाणहून दिसले होते. पुढील बुधाचे अधिक्रमण हे २०१९ मध्ये ११ व १२ नोव्हेंबर ला दिसणार आहे. शुक्राची अधिक्रमणे मात्र खूपच दुर्मिळ असतात. इ.स. २००४ मध्ये ०८ जून ला शुक्राचे अधिक्रमण झाले होते; त्यानंतर इ.स. २०१२ मध्ये ५ व ६ जून ला पृथ्वीवरील काही ठिकाणहून २१व्या शतकातील शेवटचे शुक्र अधिक्रमण पाहण्याची संधी खगोलप्रेमींना मिळाली होती. आता शुक्राचे पुढील अधिक्रमण इ.स. २११७ मध्ये १० व ११ डिसेंबर ला दिसेल.
▲सूर्यग्रहणाप्रमाणेच अधिक्रमण पाहताना देखील डोळ्यांची योग्य काळजी घेऊन योग्य उपकरणे वापरून निरीक्षण करावे.
== पिधान ==
जेव्हा एखादी लहान कोनीय माप (म्हणजेच
== बाह्य दुवे ==
|