"नवरात्र (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ५:
नवरात्र साधारणपणे देवीचे असते, पण इतर देवांची नवरात्रेही असतात. तुळजाभवानीचे नवरात्र दहा दिवसांचे असते, तशीच खंडोबाचे, व्यंकटेशाचे, नरसिंहाचे, दत्ताचे अशी इतरही नवरात्रे असतात. यापैकी नरसिंहाचे नवरात्र तीन ते नऊ दिवस, खंडोबाचे पाच किंवा सहा दिवस, बालाजी (व्यंकटेशाचे) दहा दिवस, दत्ताचे नऊ ते दहा दिवस असते. शाकंभरीचे (बनशंकरी देवीचे) नवरात्रही असते. यांशिवाय,
* गुप्त नवरात्र : तांत्रिक मंडळी प्रचलित असलेले हे नवरात्र [[आषाढ]] (किंवा माघ) महिन्यातल्या शुद्ध प्रतिपदेपासून [[नवमी]]पर्यंत असते. २०१८ साली हे नवरात्र १३ जुलै रोजी सुरू होऊन २१ जुलैला संपेल. या नवरात्रीतली देवीची साधना चैत्री किंवा शारदीय नवरात्रापेक्षा कठीण असते. ही आराधना गुप्त रीतीने केली जाते, म्हणून या नवरात्राला गुप्त नवरात्र म्हणतात. या नवरात्रीदरम्यान १० महाविद्यांच्या [https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE] साधनेला विशेष महत्त्व असते. गुप्त नवरात्र विशेषेकरून पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व आसपासच्या प्रदेशांत साजरे होते.
* चंपाषष्ठीचे नवरात्र : मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. [[जेजुरी]]ला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.
* दत्ताचे नवरात्र : मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ते मार्गशीर्ष पौर्णिमा असे दत्ताचे नवरात्र असते. अबेजोगाईला संत दासोपंतांच्या वाड्यातील धाकट्या देव्हाऱ्यात हे असते. षष्ठीसह सप्तमीला नवरात्र बसते. नसता सप्तमीला बसते. नवरात्रात रोज देवाला अभिषेक असतो. नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी यंत्रपूजा असते. यंत्र दासोपंतांनी तयार केलेले आहे. त्यावर मंत्र लिहिलेले आहेत. यंत्रपूजा झाल्यावर, नवरात्र असेपर्यंत यंत्राला रोज हळदीकुंकू वाहिले जाते. नवरात्र म्हणून माळ वगैरे नसते. परंतु तेलाचा एक व तुपाचा एक असे दोन नंदादीप अखंड तेवत असतात. पौर्णिमेला नवरात्राची सांगता होते, तेव्हा होमहवन, पुरणावरणाचा नैवेद्य केला जातो.
|