"तुळशी विवाह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ९:
घरातीलच कन्या मानून, घरातील [[तुळशी वृंदावन|तुळशी वृंदावनाची]]-तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची- गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात, सजवितात. त्यावर ''बोर चिंच आवळा, कृष्णदेव सावळा'' असे लिहितात. [[बोर]], [[चिंच]], [[आवळा]], [[सिताफळ]], [[कांदा|कांद्याची पात]] त्यात ठेवतात. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि [[कृष्ण|कृष्णा]]ची पूजा करतो. नंतर त्यांना [[हळद]] व तेल लावून मंगल स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून [[ऊस|उसाची]] वा धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड चौथा </ref>
गोवा, दीव आणि दमण यॆथे तुळशीविवाह सार्वजनिकरीत्या साजरा होतो. तुळशीची व बाळकृष्णाची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या दणदणाटात सरकारी इतमामात मिरवणूक निघते. सन २०१७मध्ये गोव्यात तुळशी विवाहाचे पौरॊहित्य महिलांनी केले आणि गोव्याच्या उपराज्यपालांनी तुळशीचे कन्यादान केले.
==आख्यायिका ==
|