"मुस्लिम सण आणि उत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
 
रमझान हा शब्द रम्झ म्हणजे जळणे या मूळ शब्दावरून आला. मुस्लिम दिनदर्शीकेत बदल होण्यापूर्वी हा महिना, जाळून टाकणाऱ्या उन्हाळ्यात येत असे म्हणून, किवा या उपासाने सर्व पापे जळून जातात अशी श्रद्धा असते म्हणून या महिन्याला रमझान हे नाव पडले असावे. या महिन्यातील एक रात्र अशी मानली जाते की जी प्रेषित महमद यांच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही माहीत नसते. या रात्री सर्व प्राणीमात्र व वनस्पती ईश्वराला आदरपूर्वक वाकून वंदन करते असे मानले जाते.
 
रमझान संपल्यावर येणाऱ्या बीजेच्या दिवशी ईद-उल-फ़ित्र ऊर्फ रमझान ईद साजरी होते. रमझान महिन्यानंतर सुमारे ७० दिवसांनी येणाऱ्या दशमीला ईद-उल जुहा किंवा बकरीद म्हणतात.
 
'''(५) शब्बे कदर (लैलत उल कदर)''' - शब म्हणजे रात्र व कदर म्हणजे न्यायदान, शब्बे कदर म्हणजे न्यायदानाची रात्र. रमझान महिन्यातल्या शेवटच्या दहा दिवसातली ही एक रात्र असते. बहुदा ही सत्ताविसावी रात्र असते असे मानले जाते, परंतु त्याबद्दल निश्चिती नसल्याने शेवटच्या दहा दिवसातील विषम दिनाच्या रात्रीपैकी ती कोणतीही एक रात्र असू शकते. (एकविसावी, तेविसावी, पंचविसावी, सत्ताविसावी, किवा एकोणतिसावी) ही रात्र नेमकी कोणती हे प्रेषित महमद यांच्याशिवाय कोणालाच माहीत नसते असे मानले जाते. रमझान महिन्याच्या या रात्रीपर्यंतच्या वर्षात मानवाने जी कृत्ये केलेली असतात, त्याबाबतचे न्यायदान या रात्री ईश्वर करतो व त्यासाठी पृथ्वीवर अनेक प्रेषित पाठवितो असे मानले जाते.