"सूर्याचे राशिभ्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६०:
* उत्तराभाद्रपदा नक्षत्र : १८ मार्च ते ३० मार्च
* रेवती नक्षत्र : ३१ मार्च ते १३ एप्रिल
 
==सूर्याच्या नक्षत्रात असण्याबद्दल काही सामाजिक व सांस्कृतिक संकल्पना==
* सत्तावीस वजा नऊ = शून्य :- मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा आणि हस्त ही महाराष्टातल्या पावसासाठीची नऊ नक्षत्रे आहेत. सूर्य मृग नक्षत्रात आला की, पावसाळा सुरू होतो आणि तो चित्रा नक्षत्रात गेला की, पावसाळा संपतो. म्हणून मृग ते हस्त ही सारी पावसाची नक्षत्रे मानली जातात. एकूण नक्षत्रे सत्तावीस असली तरी यांच नऊ नक्षत्रांत पाऊस पडला नाही तर परिणाम शून्य. त्यामुळे, सत्तावीस वजा नऊ = शून्य!
* जॆव्हा सूर्य मृग नक्षत्रात असतो, तॆव्हा गडगडाटासह माॅन्सूनपूर्व पाऊस पडतो. नैर्ऋत्य माॅन्सून देशात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असतो, पण देशावरची परिस्थिती त्याला अडथळा करते. या संघर्षातून ढगांचा गडगडाट होतो. काही दिवसातच माॅन्सूनचा जोर वाढतो आणि सर्व अडथळे दूर करून माॅन्सून भारतभर पसरतो.
* जेव्हा सूर्य हस्त नक्षत्रात असतो, तेव्हा महाराष्ट्रात हत्तीच्या सोंडेसारखा मुसळधार पाऊस पडतो. हत्तीचे चित्र काढलेल्या बसायच्या लाकडी पाटाभोवती फेर धरून स्त्रिया व मुली भोंडला खेळतात.
* २५ मे रोजी सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो. तो दिवस धरून पुढचे एकूण नऊ दिवस मध्य प्रदेश आणि आजूबाजूच्या ताज्यांत हवेचे तापमान खूप जास्त असते आणि उन्हाळ्याची सर्वाधिक तीव्रता जाणवते.
* वैशाख वणवा :- वैशाखात जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण जास्त असते. अश्या आगीला वैशाख वणवा म्हणतात. एखाद्याच्या आयुष्यात रखरखाट असेल, तर त्यालाही वैशाख वणव्याची उपमा देतात.
* काल वैसाखी : बंगालमध्ये वैशाख महिन्यात ज्या स्थानिक वावटळी आणि धुळीची वादळे हॊतात त्यांना काल वैसाखी म्हणतात.
* श्रावणधारा : महाराष्ट्रात श्रावण महिन्यात सौम्य ऊन व झिमझिम पाऊस पडतो, अशा पावसाला श्रावणधारा म्हणतात.