"अमावास्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
किंचित भर |
भरपूर |
||
ओळ १:
[[चित्र:New moon symbol.svg|इवलेसे|उजवे|अमावास्येच्या रात्रीचा चंद्र]]
'''{{लेखनाव}}''' ही कालमापनातील एक तिथी आहे. ज्यावेळी पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग न दिसता अप्रकाशित भाग दिसतो, ती तिथी अमावस्या असते. (अमा-सह, वस-राहणे). 'सूर्याचन्द्रमसोर्य: पर: सन्निकर्ष: सामावास्या' (=सूर्य-चंद्रांच्या परम सान्निध्याला अमावस्या म्हणावे) असे गोभिल सांगतो. ज्या तिथीला चंद्र दिसत नाही, ती अमावस्या, अशी व्याख्या मिताक्षरेत सांगितली आहे. अमान्त पंचांग पाळणाऱ्या महाराष्ट्र-गुजराथ-कर्नाटकांत अमावास्येच्या नंतर येणाऱ्या प्रतिपदेपासून पुढचा (चांद्र)महिना सुरू होतो.
अमावस्येचा उल्लेख ऋग्वेदात आढळत नाही. पण सूर्यग्रहण अमावस्येलाच होते आणि अनेक अमावास्येचे तीन प्रकार आहेत. सूर्यॊदयापासून सूर्यास्तापर्यंत असलेल्या अमावास्येला सिनीवाली अमावास्या म्हणातात. (ऋग्वेदात सिनीवाली नामक देवतेचा निर्देश आढळतो. अपत्यप्राप्तीसाठी तिची पूजा केली जात असे. अथर्ववेदात अमावास्येलाच सिनीवाली म्हटले आहे.) सूर्यॊदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या अंशत: चतुर्दशी आणि अंशत: अमावास्या असेल तर त्या अमावास्येला दर्श अमावास्या, आणि अंशत: प्रतिपदा असेल तर कुहू अमावास्या म्हणतात.
सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात. श्रावण अमावास्येला पिठोरी अमावास्या हे नाव आहे. त्या दिवशी बैलपोळा असतो. सर्वपित्री अमावास्या भाद्रपदात व मौनी अमावास्या माघात येते. आषाढी अमावास्येला सुसंस्कृत माणसे दिव्याची अमावास्या, तर अन्य लोक गटारी अमावास्या म्हणतात.
|