"आशा बगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
'''आशा बगे''' या [[मराठी भाषा|मराठी भाषेत]] लिहिणाऱ्या भारतीय कादंबरीकार व लेखिका आहेत. त्यांच्या भूमी या कादंबरीला २००६ चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला.
आशा बगे यांचे बालपण नागपूर येथे गेले. त्यांचे वडील वकील होते. बगे यांचे मराठी साहित्य व संगीतात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. नोकरी न करता घरसंसार सांभाळून लेखनाचा छंद जोपासला. आशा बगे यांच्या लेखनाची सुरुवात ‘सत्यकथे’पासून झाली. त्यांची गाजलेली कथा ‘रुक्मिणी’ १९८० साली प्रसिद्ध झाली. मौजचे श्री.पु. भागवत व राम पटवर्धन यांनी मग आशा बगेंच्या लेखनशैलीला आकार दिला व नंतर मौज व बगे असे समीकरण जुळून गेले. मौजच्या दिवाळी अंकात नेमाने लेखन करणाऱ्या आशा बगे यांचा २०१८ सालापर्यंतचा प्रकाशित ग्रंथसंभार १३ लघुकथासंग्रह, सात कादंबऱ्या, ललितलेखांची दोन पुस्तके असा व्यापक आहे.
आशा बगे यांचा ‘मारवा’ हा कथासंग्रह विशेष प्रसिद्ध आहे, तर ‘भूमी’ व ‘त्रिदल’ या कादंबऱ्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. ‘भूमी’ला २००७ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. यात त्यांनी प्रथमच एका तमिळ मुलीचे भावविश्व रेखाटले आहे. ‘दर्पण’ हा त्यांचा गाजलेला कथासंग्रह. या पुस्तकासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार त्यांना मिळाला.
आशाताईंना संगीताची खूप आवड आहे. संगीतावर त्यांनी अनेकदा लिहिलेही आहे. त्यांच्या लेखनातसुद्धा संगीताचा संदर्भ हमखास येतोच. त्यांचे आयुष्य मोठय़ा व एकत्रित कुटुंबात गेले. त्याहीमुळे असेल, पण अशा कुटुंबांत होणारी स्त्रियांची घुसमट अनेक कथांमधून त्यांनी समर्थपणे मांडली आहे.
==आशा बगे यांचे प्रकाशित साहित्य ==
Line २८ ⟶ ३२:
* सेतू (कादंबरी)
== पुरस्कार आणि सन्मान ==
* दर्पण या कथासंग्रहासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार
* 'भूमी'साठी २००६चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]]
* २०१२चा [[मालतीबाई दांडेकर]] पुरस्कार
* २०१८ : [[राम शेवाळकर]] यांच्या नावाचा (पहिला) साहित्यव्रती पुरस्कार
* विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या लेखिका संमेलनाचे अध्यक्षपद
== बाह्य दुवे ==
|