"प्रवीण बांदेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो ज ने लेख प्रविण बांदेकर वरुन प्रवीण बांदेकर ला हलविला |
No edit summary |
||
ओळ १:
प्रवीण बांदेकर हे एक मराठी साहित्यिक आहेत. ’नवाक्षर दर्श’न’ या वाङ्मयीन मराठी नियतकालिकाचे ते संंस्थापक असून त्याचे ते अनेक वर्षे संपादक आहेत. अनेक वाङ्मयविषयक चर्चासत्रांंमधून ते अभ्यासपूर्ण शाेधनिबंधांचे वाचन करीत असतात.
प्रवीण यांचे मूळ गाव बांदा असले तरी त्यांचा जन्म आजोळी वेंगुर्ल्याला झाला होता. वडील कृषिखात्यात नोकरीला असल्यामुळे त्यांच्या बदलीनिमित्त दर दोन-चार वर्षांनी प्रवीण बांदेकर यांना कोकणातील गावोगाव फिरता आले. तरीसुद्धा वेंगुर्ल्याशी त्यांची अतूट नाळ जुळली. प्रवीण बांदेकर यांचे महाविद्यालयीन शिक्षणही वेंगुर्ल्यातल्या बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयात झाले. तिथेच त्यांना [[गुरुनाथ धुरी]] नावाचे प्राध्यापक भेटले. त्यांनी बांदेकरांची साहित्यामधील आवड जोपासली.
नंतर इंग्रजीत एम.ए. करायला बांदेकर गोवा विद्यापीठात गेले आणि तिथे त्यांना साहित्यिक [[भालचंद नेमाडे]] भेटले. नेमाडेंमुळे बांदेकरांचे साहित्याचे-विचारांचे क्षितिज व कक्षा आणखीनच रुंदावल्या. शिक्षण पूर्ण होताच बांदेकर सावंतवाडीच्या आर.पी.डी. ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि सावंतवाडीतील सर्जनशीलतेला खतपाणी घालणार्या वातावणामुळे प्रवीण बांदेकर यांच्यातल्या कवी-लेखकाचा तेथे खरा विकास झाला.
कवी वसंत सावंत, संवादी कविमित्र वीरधवल परब, अजय कांडर आणि अनिल धाकू कांबळी ही मंडळी बांदेकरांना सावंतवाडीतच भेटली. वसंत सावंत यांनी स्थापन केलेला ‘सिंधुदुर्ग साहित्य संघ’ हेच या बहुतेकांचे पहिले साहित्यिक व्यासपीठ होते. बांदेकरांनी पहिली कविता या साहित्य संघाच्या मंचावरच वाचली होती.
उजव्या साेंडेच्या बाहुल्या ही कादंबरी 2017 ला प्रसिद्ध. ▼
==प्रवीण बांदेकर यांचे साहित्य==
* खेळखंडाेबाच्या नावानं (दीर्घ कविता)
* घुंगुरकाठी (ललितलेख संग्रह)
* चाळेगत (कादंबरी, २००९)
* येरू म्हणे (कवितासंग्रह)
==प्रवीण बांदेकर यांना मिळालेले पुरस्कार==
* ‘विभावरी पाटील’ पुरस्कार
* सोलापूरचा मानाचा ‘भैरुरतन दमाणी’ पुरस्कार
[[वर्ग:मराठी लेखक]]
|