"तात्या टोपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
King Prithviraj II ने लेख तात्या टोपे वरुन तांत्या टोपे ला हलविला: या स्वातंत्र्य सैनिकाने तात्या टोपे म... |
Removed redirect to तांत्या टोपे खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले |
||
ओळ १:
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = रामचंद्र पांडुरंग टोपे
| चित्र = Tantiatope.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = तात्या टोपे इ.स. १८५९
| टोपणनाव = तात्या टोपे
| जन्मदिनांक = [[इ.स. १८१४|१८१४]]
| जन्मस्थान = [[येवला]]([[नाशिक]])
| मृत्युदिनांक = [[एप्रिल १८]], [[इ.स. १८५९|१८५९]]
| मृत्युस्थान = शिवपुरी,[[मध्य प्रदेश]]
| चळवळ = [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध]]
| संघटना =
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]]
| प्रभाव =
| प्रभावित =
| वडील नाव = पांडुरंगराव टोपे
| आई नाव = रखमाबाई
| पती नाव =
| पत्नी नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
'''रामचंद्र पांडुरंग टोपे''' ऊर्फ '''तात्या टोपे''' <ref>National Archives of British India, 1859</ref> ([[इ.स. १८१४|१८१४]] - [[एप्रिल १८]], [[इ.स. १८५९|१८५९]]) हे [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|१८५७ च्या उठावामधील]] सेनानी होते.
== जीवन ==
तात्या टोपे यांचा जन्म [[इ.स. १८१४|१८१४]] मध्ये [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्यातील]] [[येवला|येवल्यात]] झाला. पांडुरंग टोपे यांच्या आठ अपत्यांपैकी तात्या हे दुसरे अपत्य. त्यांचे मूळ नाव रघुनाथ. त्यांचे नाव रामचंद्र असेही ठेवण्यात आले होते. रघुनाथचे वडील [[पेशवे|पेशव्यांकडे]] दानाध्यक्षाचे काम पाहण्यासाठी ब्रह्मावर्तास येऊन राहिले. पर्यायाने रघुनाथचे अर्थात तात्यांचे बालपण [[नानासाहेब पेशवे]] आणि [[राणी लक्ष्मीबाई]] यांच्याबरोबर गेले. पुढे बरीच वर्षे नानांच्या दरबारात तात्या कारकुनी कामांत गुंतलेले होते. [[इ.स. १८५७|१८५७]] च्या स्वातंत्र्यसमरात [[ग्वाल्हेर]]हून तात्यांनी आणलेल्या सैन्यावर मुख्य [[सेनापती]] म्हणून नानासाहेबांनी त्यांचीच निवड केली. त्या वेळी तात्यांच्या कर्तृत्वाचा कस लागला. [[कानपूर]]वर चढाई करण्यासाठी तात्या सज्ज झाले.
[[इ.स. १८५७|१८५७]] मधील [[दिल्ली]], [[लखनौ]], [[जगदीशपूर]] व [[कानपूर]] या ठिकाणच्या उठावांचे सूत्रधार तात्या टोपेच होते. त्यांचा धाडसी स्वभाव, गनिमी काव्याचे अवगत तंत्र, स्वदेशावरची श्रद्धा आणि स्वामिनिष्ठा यांच्या बळावर त्यांच्या तलवारीला धार आली होती. [[कानपूर]], [[लखनौ]], [[झाशी]] असे कूच करताना तात्यांचा पराक्रम पणाला लागला. कमकुवत सैन्य, नियोजनाची कमतरता, पैसा-रसद-तोफा या साधनांची कमतरता असताना त्यांना यशापयशाची चव चाखायला लागत होती, पण तात्यांची ध्येयासक्ती प्रचंड होती.
[[नानासाहेब पेशवे]] यांचा अज्ञातवास, [[ग्वाल्हेर]]च्या लढाईत [[राणी लक्ष्मीबाई]]चा पराभव या पार्श्वभूमीवर एकच मराठी वाघ शत्रूला तोंड देत होता. शत्रूवर जरब बसवत, वेळोवेळी इंग्रजांच्या तावडीतून सुटून पुढचे ध्येय गाठण्याचा त्यांचा यत्न इंग्रजांना मेटाकुटीला आणत होता. तात्यांच्या या पराक्रमाची गाथा जगभर पसरली. काही युरोपियन इतिहासकारांनी तात्यांच्या शौर्याचा गौरव त्या काळी केला होता.
तात्यांची एकाकी झुंज थकली, जिंकण्याची आशा लोपली. इंग्रजांपुढे वाकायचे नाही हा निश्चय मात्र कायम होता. तात्या शत्रूपासून बचाव करताना मानसिंग या मित्राच्या आश्रयाला गेले. तात्यांच्या पराक्रमाला थिटी पाडणारी घटना घडली, तात्यांचा मागमूस काढणारी इंग्रजी फौज मानसिंगापर्यंत पोहोचली. मानसिंगाची फितुरी नडली आणि तात्या इंग्रजांचे कैदी झाले.
[[७ एप्रिल]], [[इ.स. १८५९|१८५९]] रोजी आरोपांना उत्तर देताना तात्यांच्या चेहेऱ्यावर भीती नव्हती, अपराधीपणा नव्हता, दु:ख तर नव्हतेच,देशाभिमान अन् हौतात्म्याचे समाधान मात्र होते. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातल्या होमकुंडात तात्यांची शेवटची आहुती पडली. [[१८ एप्रिल]], [[इ.स. १८५९|१८५९]] रोजी त्यांना [[मध्य प्रदेश|मध्य प्रदेशातील]] [[शिवपुरी]] येथे फाशी देण्यात आले. या ठिकाणीच त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. तसे तात्या टोपेंचे पुतळे मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी आहेत. भोपाळला तात्या टोपे नगर (टी.टी. नगर) नावाची पेठ आहे, [[तात्या टोपे स्टेडियम]] आहे, शेजारी टोपेंचा भव्य पुतळाही आहे.
{{साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा}}
==References==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:टोपे,तात्या}}
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:महाराष्ट्राचा इतिहास]]
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १८१४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८५९ मधील मृत्यू]]
|