"सौदागर नागनाथ गोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४५:
सौदागर नागनाथ गोरे ह्यांचा जन्म [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातल्या]] कोरेगाव भाडळीत १० मार्च, इ.स. १९१८ रोजी, महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी झाला. जन्मतःच त्यांना एक दात होता. खेडेगावात ही गोष्ट खूप अशुभ मानली गेली. त्यावेळी सौदागरांच्या मामाने त्यावेळच्या कुर्तकोटी शंकराचार्यांना याबाबत विचारले. शंकराचार्यांनी सांगितले की हा मुलगा मोठेपणी खूप नाव कमावणार आहे. सौदागरांना गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी मिळाली होती.
 
कोरेगावमध्ये मराठी तिसरीपर्यंतच सौदागरांचे शिक्षण झाले. शाळेत कॊणी पाहुणा येणार असेल तर ईशस्तवन व स्वागतपद्य म्हणण्यासाठी सौदागरांना सांगितले जाई. शाळेला भेट देणार्‍या दामूअण्णा जोशी यांनी या रत्नास अचूक हेरले आणि सौदागरांचे वडील दामूअण्णा यांच्याकडे या मुलाची मागणी केली. सौदागर आणि धाकटा भाऊ पितांबर यांना घेऊन दामूअण्णा पुण्याला आले. आणि सौदागरांचे संगीत शिक्षण सुरू झाले. त्यांना नाट्यगीते शिकवण्यासाठी बळवंत गोवित्रीकर यांना बोलावण्यात आले. दत्तूबुवा बागलकोटकर यांनी त्यांना शास्त्रीय संगीताचे धडे दिले. यानंतर नरहरबुवा पाटणकर, गणेशबुवा पाध्ये यांनीही सौदागरांना गायनाचे शिक्षण दिले. टप्पा आणि ठुमरीचेही शिक्षण दिले. देवमाणूस या नाटकातील पदांच्या चाली छोटा गंधर्व यांच्या होत्या.
 
[[प्र.क्र. अत्रे]] यांच्या साष्टांग नमस्कार या नाटकात सौदागरामची स्त्री-भूमिका होती. त्यानंतर घराबाहेर या नाटकात सुरुवातीला स्त्रीभूमिका आणि मग पुरुष भूमिका होती. उण्यापुऱ्या १० वर्षे वयाच्या सौदागराने ’'प्राणप्रतिष्ठा’' ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.rediff.com/news/1998/jan/02gandh.htm | शीर्षक = ''छोटा गंधर्व डेड'' (''छोटा गंधर्व वारले'') : छोटा गंधर्व ह्यांच्या निधनाचे वृत्त | प्रकाशक = रेडिफ.कॉम | दिनांक = २ जानेवारी, इ.स. १९९८ | अ‍ॅक्सेसदिनांक = ११ जुलै, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}</ref>. [[अनंत हरी गद्रे]] ह्या समाजसुधारकाने मधुर गळ्याच्या सौदागरला 'छोटा गंधर्व' हा किताब बहाल केला<ref>{{cite websantosh | दुवा = http://www.mumbaimirror.com/printarticle.aspx?page=comments&action=translate&sectid=135&contentid=20090605200906050209319779e238541&subsite= | शीर्षक = ''राग मफिन'': छोटा गंधर्व ह्यांच्यावरील लेख|विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.is/PEqZ |विदा दिनांक=२५ ऑगस्ट २०१४ | प्रकाशक = मुंबईमिरर.कॉम | दिनांक = ५ जून, इ.स. २००९ | अ‍ॅक्सेसदिनांक = ११ जुलै, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}</ref>. निर्भीड या वृत्तपत्रात त्यांचा सर्वप्रथम छोटा गंधर्व असा उल्लेख केल्याचे आढळते. देवमाणूस या नाटकातील पदांच्या चाली छोटा गंधर्व यांच्या होत्या.
 
छोट्या गंधर्वांना १९५० साली अभिजात संगीत नाटकांमधून कृष्णाची भूमिका करण्याची संधी मिळाली. या भूमिकेने इतिहास घडविला. त्यानंतर मानापमानमधे धैर्यधर या पहिल्या अंकातील शूर वीर आणि नंतरचा प्रेमात पडलेला धैर्यधर या भूमिका छोटा गंधर्व इतक्या सुंदर करायचे की प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घ्यायचेच बाकी ठेवले होते.
 
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. गुणरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-3720192,prtpage-1.cms | शीर्षक = ''स्मरण अखेरच्या गंधर्वाचं...'': छोटा गंधर्व ह्यांच्यावरील लेख | प्रकाशक = महाराष्ट्रटाइम्स.कॉम }}</ref>.
 
इ.स. १९४३मधे१९६३मधे त्यांनी काही कलाकारांसह छोट्या गंधर्वांनी 'कलाविकास' (छोटा गंधर्व कन्सर्न) ही स्वतःची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेचे 'देवमाणूस' हे खूप गाजले. या नाटकातून छोटा गंधर्व हे गीतकार म्हणूनही पुढे आले. कलाविकास आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकली नाहीत. तिच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आणि ती बंद पडली.
 
आवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणार्‍या या अवलियाला आपला उतारवयातला आवाज प्रेक्षकांना ऐकू नये असे वाटत होते. म्हणूनच १९७८ मध्ये स्वरवैभवाच्या शिखरावर असताना, छोटा गंधर्व यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला. १९७९ मधे [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या]] अध्यक्षपदाचे भाषण केल्यावर झालेल्या एका प्रयोगासाठी त्यांनी पुन्हा चेहऱ्याला रंग लावला. त्यानंतर १९८०-१९८१ मधे काही प्रयोगांत आग्रहाखातर भूमिका करून रसिकांना आनंद दिला.