"रघुनाथ अनंत माशेलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
[[चित्र:Ramesh Mashelkar Apr09.jpg|thumb|रघुनाथ अनंत माशेलकर]]
'''रघुनाथ अनंत माशेलकर''':यांचा जन्म १ जानेवारी १९४३मध्ये [[गोवा]] या राज्यातील [[माशेल]] गावात झाला. त्यांना '''रमेश माशेलकर''' या नावानेही ओळखले जाते.<ref name=Gala>[http://cms.icheme.org/mainwebsite/General-Baraec56ff8.aspx?Map=038C73C6E1E4F1DE68EE0F8144978E7D IChemE Gala Awards Programme, 25 October 2007] Welcome by IChemE President, Dr Ramesh Mashelkar</ref>. ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत. ते [[CSIR India|वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ]] (CSIR)या संघटनेचे माजी अध्यक्ष होते.<ref name=CSIR>[http://www.csir.res.in CSIR]</ref> रघुनाथ माशेलकर, सी.एस.आय.आर.चे प्रमुख झाले, त्यावेळी सी.एस.आय.आर.मध्ये २८,००० लोक काम करत होते. देशभर जागोजागी प्रयोगशाळा वसवल्या होत्या. परंतु त्या अपेक्षितपणे काम करत नव्हत्या. माशेलकरांनी व्हिजन नावाची योजना आखली. चाळीस प्रयोगशाळांचे समांतर चालणे थांबवून, त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ट पद्धतीने बांधले आणि मग त्यातून भारतीय वैज्ञानिक संशोधनाचे एक अचाट पर्व निर्माण झाले.
आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारा, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास
==बालपण आणि शिक्षण==
रघुनाथ माशेलकरांचा जन्म कोकणातल्या माशेल गावाचा. बालपण मुंबईत गेलं. मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचे आयुष्य घडवले. त्यांच्या आई, हे त्यांचे प्रमुख प्रेरणास्थान होते. शिवणकाम किंवा मिळेल ते काम करून माशेलकरांच्या आई काही कमाई करत असत. एकदा त्या गिरगावातल्या काँग्रेस भवनात काम मागण्यासाठी गेल्या. संबंध दिवस तिथे उभे राहूनदेखील त्यांना काम दिले गेले नाही. त्या कामासाठी तिसरी उतीर्ण असणं आवश्यक होते आणि माशेलकरांच्या आईंचे तेवढे शिक्षण नव्हते. खोटे बोलून त्यांना कदाचित ते काम मिळवता आले असतेही. पण तसे न करता, त्यांनी स्वतःच्याच मनाशी निर्धार केला - आज माझे शिक्षण नाही म्हणून मला काम मिळाले नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी जगातले सर्वोच्च शिक्षण देईन. हा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. अकरावीच्या परीक्षेत रघुनाथ माशेलकर बोर्डाच्या मेरिटमध्ये आले. पण परिस्थितीमुळे त्यांनी पुढे न शिकण्याचे ठरवले. इथेही आईच्या आग्रहामुळे त्यांनी बी.केम.ला प्रवेश घेतला. १९६९ साली मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या तत्कालीन संचालक प्रा. एम्. एम् शर्मा या अत्यंत सृजनशील संचालकाच्या मार्गदर्शनाखाली, माशेलकरांनी आपली पी.एच.डी. ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर युरोपमधील सल्फोर्ड विद्यापीठात जाऊन पोस्ट डॉक्टरल संशोधनही केले.
==हळदीची लढाई==
==रघुनाथ माशेलकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
|