"उर्वशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
हिंदू पौराणिक कथांनुसार [[नर]] व [[नारायण]] हे हिमालयात उग्र तपश्चर्येला बसले होते. त्यांच्या तपश्चर्येने आपले इंद्रपद डळमळते आहे अशी भीती वाटल्याने इंद्राने आपल्या दरबारातील अप्सरांना त्यांचा तपोभंग करण्यासाठी पाठवले. इंद्राचा कावा लक्षात आल्याने संतापलेल्या या ऋषींनी आपल्या मांडीवर थाप मारली व त्यातून इंद्राच्या दरबारातील इतर अप्सरांपेक्षा अतीव सुंदर असणार्‍या उर्वशीचा जन्म झाला. ([[संस्कृत भाषा|संस्कृतात]] 'उरू' म्हणजे मांडी.) तिचे स्वर्गीय सौंदर्य पाहून इंद्राने पाठवलेल्या अप्सरांचे गर्वहरण झाले आणि त्या लाजेने चूर झाल्या. स्वतः इंद्राने नर व नारायणांची क्षमा मागितली. या ऋषींनी राग विसरून उर्वशीला इंद्राच्या दरबारात पाठवले.
 
उर्वशी पुढे ही पुरूरव्याची पत्नी झाली. ही कालिदासाच्या विक्रमोर्वशीय या नाटकाची नायिका आहे.
 
[[वर्ग:अप्सरा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/उर्वशी" पासून हुडकले