"समर्थ रामदास स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
जन्म -मृत्यू दिनांक खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन |
|||
ओळ १२७:
समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दर्याखोर्यातून, डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगायमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठमहंत निर्माण करून, निःस्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभु [[राम|श्रीरामचंद्र]], आदिशक्ति तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी [[मारुती|मारुतीराया]] या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. अक्षरश: शेकडो मारुती मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वतः डोंगरदर्यांत, घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. समर्थावर [[एकनाथ|संत एकनाथाच्या]] वाङ्मयाचा प्रभाव असल्याने प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. [[भारत|हिंदुस्थान]] बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.
‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे। परंतु, तेथे अधिष्ठान पाहिजे। भगवंताचे।’ या त्यांच्याच सूत्रानुसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणार्या समर्थांचे हे मुख्य उद्दिष्ट होते छत्रपती [[शिवाजी]] महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन रामदास स्वामी भारावून गेले.
==शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना दिलेली सनद==
[[शिवाजी]] महाराज रामदासांना आपले गुरू मानीत असत. छत्रपती शिवाजी महाराजांनी १५ सप्टेंबर १६७८ मध्ये समर्थ रामदास स्वामींना एक विस्तृत सनद लिहून काही गावे इनाम म्हणून दिली होती. याबाबतचे एक पत्र इ. स. १९०६ मध्ये धुळ्याच्या शंकरराव देवांनी ‘समर्थांची दोन जुनी चरित्रे’ या ग्रंथात प्रकाशित केले होते; पण या वेळेस देवांना या पत्राची मूळ प्रत न मिळता एक नक्कल सापडली होती.
यानंतर इतिहासाचार्य राजवाड्यांनाही या पत्राच्या काही नकला सापडल्या. शिवाय, अनेक नकला पुणे पुराभिलेखागारात इनाम कमिशनच्या दफ्तरातही सापडतात; पण या सगळ्या नकला अथवा मूळ पत्राच्या कॉपी असून मूळ पत्र हे अनेक वर्षे कोणाच्याही पाहण्यास आले नव्हते. अखेरीस मे २०१७ मध्ये लंडनच्या ‘ब्रिटिश लायब्ररी’त या मूळ पत्राची फोटोझिंकोग्राफ तंत्रज्ञानाने बनवलेली एक प्रत इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांना सापडली असून, महाराष्ट्रात आजवर सापडलेल्या नकलांवर जे शेरे आहेत, त्याबरहुकूम ही प्रत असल्याचे सिद्ध होत आहे. सदर सनदेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘मर्यादेयं विराजते’ अशी अक्षरे आहेत. पत्राच्या मुख्य बाजूवरचे अक्षर आवजी चिटणिसांच्या हस्ताक्षराशी मिळतेजुळते आहे.
‘श्रीसद्गुरुवर्य, श्रीसकळतीर्थरुप, श्रीकैवल्यधाम, श्रीमहाराज श्रीस्वामी, स्वामींचे सेवेसी चरणरज सिवाजीराजे चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापनाजे’’, अशा मायन्याने हे पत्र सुरू होते. त्यापुढे शिवाजी महाराजांनी स्वत:च्या शब्दात पूर्वी समर्थांनी त्यांना काय उपदेश केला, त्याबद्दल थोडक्यात लिहिले आहे.
या पत्राची मूळ प्रत येथे आहे.
===अकरा मारुती===
|