"उढेवाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: उढेवाडी हे पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यापासून सुमारे सोळा-सतरा कि...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
पहिल्या निवडणुकीपासून ग्रामपंचायतीचे सभासद बिनविरोध निवडून येत आहेत. गावाची वस्ती बहुतांशी आदिवासी, प्रामुख्याने आदिवासी महादेव कोळी व पाणभरे कोळी.. मात्र, जातीच्या दाखल्यांअभावी येथील ग्रामस्थ सरकारच्या योजनांपासून वंचित राहत होते. निवडणुकांमध्ये आरक्षण जाहीर होते. मात्र जातीचे दाखले नसल्याने ग्रामस्थांच्या अडचणी होत्या. या अडचणींमुळे निवडणुकीतही सहभागी होता येत नव्हते. यामुळे २००३ ते २०१३ या दहा वर्षांच्या कालावधीत ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आला होता. मात्र, या काळातही ग्रामस्थांनी सरकारच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत दुर्गम ठिकाणी विविध विकासकामांना चालना दिली आहे. गावातील बहुतांश नागरिक हे गरीब व आदिवासी असतानाही ते कसलेही आढेवेडे न घेता ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे एक एप्रिलला शंभर टक्के कर भरणा करीत नावलौकीक मिळवला आहे.
 
ग्रामस्थांच्या एकीमुळे केंद्र सरकारची निर्मल ग्राम योजना जाहीर होताच पहिल्याच वर्षात निर्मल होण्याचा बहुमान उढेवाडीने मिळविला. सरकारचा पर्यावरण विकासरत्न पुरस्कार मिळविणारी उढेवाडी मावळातील एकमेव ग्रामपंचायत आहे. तंटामुक्त गाव, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात २००५-०६ मध्ये तालुक्‍यात प्रथम येण्याचा बहुमान गवने मिळविला. यशवंत पंचायत राज अभियानात तालुक्‍यात ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळवला. एकेकाळी रस्ता, वीज आणि पाण्याअभावी वंचित असलेले हे खेडे आज स्वयंपूर्ण होत आहे. असताना लोकसहभागातून राजकीय गदारोळात सतत ५० वर्षे बिनविरोध निवडणूक करीत इतर गावांपुढे उढेवाडीने आदर्श घालून दिला आहे.
 
 
 
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील गावे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/उढेवाडी" पासून हुडकले