"त्र्यंबक शिवराम भारदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''त्र्यंबक शिवराम भारदे''' ऊर्फ '''बाळासाहेब भारदे''' (
बाळासाहेब भारदे हे महाराष्ट्राचे पहिले सहकार मंत्री होते. ते त्यानंतर ते आधी विधानसभेचे अध्यक्ष झाले. ते मुरब्बी राजकारणी तर होतेच त्याचबरोबर ते गांधीवादी विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, सहकार क्षेत्रातील अग्रणी, पत्रकारही आणि कीर्तनकार होते.
भारदे कुटुंब मुळचे [[अहमदनगर]] जिल्ह्यातील शेवगावचे. बाळासाहेबांचे वडील शिवरामपंत भारदे यांचा एक प्रकांड पंडित म्हणून परिसरात दबदबा होता.
==बाळासाहेब भारदे यांची पत्रकारिता==
ओळ १६:
सहकार मंत्री झाल्याची बातमी भारदेंनी रेडिओवर ऐकली आणि नंतर ते एस.टी.ने तिकीट काढून मुंबईला गेले. हा साधेपणा त्यांनी आयुष्यभर जपला आणि समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला.
त्यांच्यावर गांधी विचारांचा पगडा असल्याने त्यांनी गांधीच्या विचारधारेवरच समाजकारण आणि राजकारण केले. त्यांनी जाती-धर्माच्या संस्था आणि संघटनांना कायम दूर ठेवले. त्यांनी उच्च पदांवर काम करताना अनेक चांगले पायंडे पाडले आणि अध्यक्ष म्हणून अपेक्षित असलेला निःपक्षपणा आपल्या निर्णयांतून दाखवून दिला. उच्च नीतिमूल्याचे आचरण करीत त्यांनी अध्यक्षपदाचे पावित्र्यही जतन केले. भारदे बुवांनी महाराष्ट्राला न संपणारे विचारधन तर दिलेच त्याचबरोबर अनेक नावीन्यपूर्ण योजनाही त्यांनी महाराष्ट्राला दिल्या.
==वक्तृत्व, विद्वत्ता आणि साधेपणा==
अर्थपूर्ण शाब्दिक कोट्या, मर्मभेदी विवेचन, विनोदी शैली ही त्यांच्या वक्तृत्वाची काही अंगे सांगता येतील. धोतर,सदरा आणि डोक्यावर गांधी टोपी घातलेले भारदे बुवा राजकारणातील संत म्हणूनच ओळखले जायचे. राजकारण, अध्यात्म, समाजकारणकिंवा सहकार आणि पत्रकारिता या सर्वच क्षेत्रांत त्यांनी आपल्या कार्याचा आणि विचारांचा ठसा उमटविला. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. मूलतःच तल्लखबुद्धी असलेले भारदे आपल्या विद्वत्तेच्या तेजाने आयुष्यभर तळपत राहिले.
राजकारणात मुरल्यावर बाळासाहेब भारदे यांनी पत्रकारिता सोडली पण कीर्तने करणे सोडले नाही.
==पुरस्कार==
* पद्मभूषण (सन २००१)
|