"शिवार साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १५:
* १ले शिवार साहित्य संमेलन इ.स. २००९ मध्ये मंजरथ या गोदावरी नदीकाठी असलेल्या खेड्यात समीक्षक डॉ. कमलाकर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यानंतर २रे ते ६वे वार्षिक शिवार संमेलन, अनुक्रमे पिंपळगाव, दिंद्रुड, सादोळ आणि लवूळ या खेड्यांच्या शिवारात भरत आले आहे. या संमेलनांचे अध्यक्षपद आतापर्यंत डी. के. देशमुख, वसंत बिवरे, प्रभाकर साळेगावकर, डॉ. वासुदेव मुळाटे, भा.य. वाघमारे या भूमिपुत्रांनी भूषवले आहे. विशेष म्हणजे थेट मातीशी नाते सांगणारे हे संमेलन असल्यामुळे या 'शिवार' संमेलनाला कवी [[फ.मुं. शिंदे]], डॉ. दादा गोरे, प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील, आसाराम लोमटे, कुंडलिकराव अतकरे, देविदास फुलारी आदी मान्यवरांनीही पाहुणे म्हणून उपस्थिती लावली आहे.
* ७वे शिवार साहित्य संमेलन १५ फेब्रुवारी २०१५ रोजी [[बीड]] जिल्ह्यातल्या [[माजलगाव]] तालुक्यातील निगुड गावी झाले. संमेलनाध्यक्ष लेखक उमेश मोहिते होते.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इतिहासातील पहिले शिवार साहित्य संमेलन अजनुज (ता. खंडाळा, जि. सातारा) या गावातील शिवारात रंगले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा खंडाळा आणि ज्ञानदीप क्रेडिट को-ऑप सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वनाथ पवार यांच्या शिवारात या साहित्य संमेलनाचे आयोजन प्रसिद्ध ग्रामीण कथाकार आणि कथाकथनकार रवींद्र कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
* नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीतर्फे निघोजे (तालुका खेड-पुणे) येथे १०-१२-२०१७ रोजी एकदिवसीय शिवार साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष पोपटराव पवार होते.
|