"शिवगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२:
प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोर एक लांबलचक तटबंदी दिसते. गडाचे संरक्षण करण्यासाठी या दुहेरी तटबंदीची योजना केली असावी. तटबंदी ओलांडून पूढे गेल्यावर उजव्या बाजूस एक बुरूज दिसतो. गडाच्या पठारावर एक सुंदर सती शिळा आहे. स्थानिक लोक तीला 'उगवाई देवी' म्हणतात. तेथून उत्तरेच्या बुरुजावर गेल्यावर खाली कुर्ली धरण दिसते. तटबंदीच्या कडेकडेने दक्षिण बुरुजापाशी गेल्यावर बुरुजाखालून कोकणातील गडगेसखल गावातून येणारी वाट दिसते, तर दक्षिणेला फोंडा गाव दिसते.
 
या शिवाय गडावर वाड्यांचे काही अवशेष आहेत. गडाचा आकार आटोपशीर असल्यामुळे गड पाहाण्यास अर्धातास पुरतो. गड उतरून परत येताना टेकडाला वळसा घातल्यावर समोरच्या कातळावर धबधब्यांच्या खुणा दिसतात. या धबधब्याजवळ पाण्याचे एक टाक आहे. धबधब्याचे पाणी पाटाने टाक्यात वळवलेले आहे. गडावर पाण्याची व्यवस्था आढळत नाही. या कुंडातील पाण्याचा वापर गडासाठी होत असावा. गडावरून आजूबाजूचा परिसर पाहात असतांना पूर्वेला दाजीपूरच्या जंगलात एका मंदिराचे शिखर दिसते. मंदिर असलेल्या या परिसराला 'झांजेचे पाणी' म्हणतात. गड पाहून परत उगवाईच्या पठारावर येऊन कच्च्या रस्त्यावरुन जंगलाच्या दिशेने चालत गेल्यावर १० मिनिटात मंदिरापाशी पोहोचता येते. गगनगिरी महाराज येथे तपसाधनेसाठी बसत असत. या मंदिराच्या मागच्या बाजूला काही घरे आहेत. ती ओलांडून पुढे गेल्यावर एक बारामाही वाहणारा झरा आहे. त्यास झांजेचे पाणी म्हणतात. येथून शिवगडाचे दर्शन होते. येथून अर्ध्या तासात परत अभयारण्याच्या प्रवेशद्वाराशी जाता येते.
 
 
 
 
 
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शिवगड" पासून हुडकले