"शिवगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ११:
==राहण्यासाठी खोल्या==
गडावर रहाण्याची सोय नाही, पण दाजीपूर अभयारण्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची रहाण्याची सोय आहे.
==कसे जावे==:
कोल्हापूरहून दाजीपूर अभयारण्याचे प्रवेशद्वार ८० किमी वर आहे. कोल्हापूरहून मालवण, कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले येथे जाणार्या एसटी बसने अडीच तासात दाजीपूरला पोहोचता येते. अभयारण्याच्या प्रवेशद्वारापाशी माणसी २०/- रुपये भरून प्रवेश घेता येतो. प्रवेशद्वारापासून ३ किमी वर उगवाईचे पठार आहे, तेथपर्यंत कच्च्या रस्त्याने खाजगी वाहनाने किंवा चालत जाता येते.
शिवगडाच्या पायथ्याशी गडगेसखल गाव आहे. कोकणातील फोंडा घाटाच्या पायथ्याशी असलेले हे गाव, फोंड्यापासून ६ किमी वर आहे. या गावातून दोन तासात दक्षिण बुरुजाच्या खालून शिवगडावर प्रवेश करता येतो.
==गड आणि त्याच्या जवळपास पाहण्यासारखी ठिकाणे==
दाजीपूर अभयारण्यातील कच्च्या रस्त्याने फॉरेस्ट रेस्ट हाऊसपर्यंत गेल्यावर एक पायवाट गगनगिरी महाराजांच्या आश्रमापाशी जाते. या वाटेने अर्धातास चालल्यावर माणूस शिवगडासमोरील पठारावर येतो. पठार व शिवगड यांच्यामध्ये एक टेकाड आहे. पठारावरुन खाली उतरून मधल्या टेकाडाला वळसा घालून थोडासा चढ चढून शिवगडावर जाता याते. येथे तटबंदीचे काही अवशेष दिसतात. शिवगडाच्या वायव्य दिशेकडे तोंड करुन असलेल्या उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश होतो. प्रवेशद्वाराचे बुरुज अजून शाबूत आहेत.
प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोर एक लांबलचक तटबंदी दिसते. गडाचे संरक्षण करण्यासाठी या दुहेरी तटबंदीची योजना केली असावी. तटबंदी ओलांडून पूढे गेल्यावर उजव्या बाजूस एक बुरूज दिसतो. गडाच्या पठारावर एक सुंदर सती शिळा आहे. स्थानिक लोक तीला 'उगवाई देवी' म्हणतात. तेथून उत्तरेच्या बुरुजावर गेल्यावर खाली कुर्ली धरण दिसते. तटबंदीच्या कडेकडेने दक्षिण बुरुजापाशी गेल्यावर बुरुजाखालून कोकणातील गडगेसखल गावातून येणारी वाट दिसते, तर दक्षिणेला फोंडा गाव दिसते.
|