"सदस्य:ज/धूळपाटी/टोपणनावानुसार मराठी गुंडांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २:
दाऊद इब्राहिम कासकर, छोटा राजन, अबू सलीम इत्यादी गुंडांव्या नुसत्या नावाने देखील मुंबईतील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर आदी भरपूर पैसे मिळवणारे व्यावसायिक घाबरत असत. आणि तरीसुद्धा असल्या गुंडांना जास्तीच्या आकर्षक टोपणनावाची गरज भासते. ही टोपणनावे त्या गुंडाच्या दिसण्यावर, राहण्याच्या ठिकाणावर किंवा कार्यपद्धतीवरून पडतात. शेख शकील बाबू मोहिद्दीन शेख हा त्याच्या बुटकेपणामुळे छोटा शकील म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा हाडवैरी राजेंद्र सदाशिव निकाळजे हा छोटा राजन या नावाने कुप्रसिद्ध आहे. त्याचा गुरू राजन नायर हा बडा राजन या नावाने ओळखला जाई, म्हणून हा छोटा राजन. छोटा राजनला अजूनही काही लोक नाना (म्हणजे गुजराथीत छोटा) म्हणतात.
छोटा शकीलशी गल्लत होऊ नये म्हणून दाऊद गँगच्या उंच्यापुऱ्या शकीलला लंबू शकील म्हणतात. इक्बाल मोहंमद अली मेमन हा बेकायदेशीर ड्रग व्यवसायात येण्यापूर्वी मिरच्या विकायचा, म्हणून त्याला इकबाल मिर्ची म्हणतात.
महाराष्ट्रातील काही गुंड आणि त्यांची टोपणनावे पुढे दिली आहेत.
ओळ २३:
* गुड्ड्या ऊर्फ रफिकोद्दीन शेख (धुळे) : (धुळे महापालिका कर वसूली विभागाच्या अग्निकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी; खून आणि चोर्या, किडनॅपिंग, जाळपोळ, खंडणी यांसह विविध गंभीर गुन्ह्यात संशयित असलेल्या गुड्ड्याचा १८ जुलै २०१७ रोजी खून झाला.
* गोट्या ऊर्फ योगेश पांडुरंग इंगळे
* चन्या ऊर्फ सागर अशोक बेग (अहमदनगरचा बनावट आधार कार्डे वापरून सिम कार्डे मिळवणारा गुन्हेगार)
* जंगल्या ऊर्फ विशाल सातपुते (सातपुते टोळीचा नायक)
* जमीर हुसेन ऊर्फ विकी डॉन (२०१४ सालातील पुण्यातल्या फरासखाना बाँबस्फोटातील गुन्हेगार) : पळून जाताना भोपाळ पोलिसांकडून ठार झाला.
* छोटा राजन टोळीतील जनार्दन रामचंद्र पासी ऊर्फ रॉबर्ट ऊर्फ जना भैय्या
* टिपू ऊर्फ रिझवान पठाण (सय्यदनगर, हडपसर-पुणे येथे राहणारा)
* टिप्या ऊर्फ आकाश अशोक बेग (अहमदनगरचा बनावट आधार कार्डे वापरून सिम कार्डे मिळवणारा गुन्हेगार)
* डब्ब्या ऊर्फ मिथुन राजू मोरे
* डोळा कळसिंग भोसले ऊर्फ आकाश (जन्म १९९६)
|