"रांजणखळगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: रिकामी पाने टाळा |
No edit summary |
||
ओळ १:
हे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.
वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजणखळग्यांची निर्मिती होते. नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक असू शकतात. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठीण खडकाचा मधला भाग तसाच रहातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रियेमुळे नदीच्या पात्रात रांजणखळगे तयार होतात.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या शेवटी टाकळीहाजी नावाचे गाव आणि नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्याचे निघोज गाव यांच्यी सीमेवरून कुकडी ही नदी वाहते. नदीच्या दोन्ही काठांवर बेसॉल्ट खडक आहे. नदीने वाहून आणलेले दगड-गोटे या बेसॉल्ट खडकावरील खोलगट भागात अडकले जातात. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगड-खोटे या भागात गोलगोल फिरून खॊलगट भागाचे अर्धगोलाकार खड्ड्यांमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला थोडी-थोडकी नव्हे तर हजारो वर्षे जावी लागतात. कालांतराने या खड्ड्यांचे रांजणाकार खळग्यांत रूपांतर होते.
==महाराष्ट्रात रांजणखळगे असलेली ठिकाणे==
* [[निघोज]] (सर्वात अधिक प्रसिद्धी मिळालेले अहमदनगर जिल्ह्यातील गाव)
|