"नाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २७:
भारतीय संस्कृतीमध्ये नागाला भीतीयुक्त आदराचे स्थान आहे. महाराष्ट्रात [[श्रावण महिना|श्रावण महिन्यात]] [[नागपंचमी]] साजरी केली जाते. या दिवशी महिला जिवंत नागाची पुजा करतात व नागाला दुधाचा प्रसाद दिला जातो. नागोबाला दूध म्हणून आरोळी देत गारूडी लोक गावागावात फिरत असतात व त्यादिवशी लोकांकडून अन्न धान्य, कपडा-लत्ता, पैसे घेतात. [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यामधील]] [[३२ शिराळा]] या गावी दरवर्षी नागपंचमी निमित्त मोठा सण आयोजित केला जातो<ref>[http://www.indianetzone.com/1/nagpanchami.htm Nagpanchami, Indian Festival]</ref>. हजारो नाग या दिवसाकरीता पकडले जातात. कित्येक पर्यटक केवळ हा सण पहायला या गावी जातात. गारुड्यांकडून पकडलेल्या या नागांचे मोठ्या प्रमाणावर हाल केले जातात असे लक्षात आले आहे. अजूनही यावर कायदा केला गेला नाही. काही संघटनांनी केलेल्या कार्यामुळे काही ठिकाणी नागपंचमीला केवळ नागाच्या प्रतिमेची पूजा केली जावी असे आवाहन केले आहे. त्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
समुद्रमंथनासाठी लागलेली [[मंदार पर्वत]]ापासून बनवलेली रवी घुसळण्यासाठी [[वासुकी]] नागाला दोरी म्हणून वापरले होते. हिंदू देवता [[शंकर]] यांनी [[समुद्रमंथन|सागरमंथना]] नंतर आलेल्या विषाचे प्राशन केले व त्यामुळे त्यांना गळ्यात प्रचंड जळजळ झाली. ह्या जळजळीपासून त्यांनी थंडावा मिळावा म्हणून नाग गळयाभोवती लपेटला व त्यांना विषप्राशन सहन करता आले, अशी कथा आहे. [[विष्णू]] हे सदैव [[शेषनाग|शेषनागाच्या]] शय्येवर विश्राम घेत असतात असे [[पुराण|पुराणात]] सांगितले आहे<ref>[http://www.webonautics.com/mythology/sheshnag.html|शेषनाग ]</ref>.
 
हिंदू धर्मातील नवनाग स्तोत्रात नागाच्या नऊ नावांचा उल्लेख आहे.ते स्तोत्र खालीलप्रमाणे-
"https://mr.wikipedia.org/wiki/नाग" पासून हुडकले