"तुळस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ २२:
{{मुख्यलेख|तुळशी विवाह}}
हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे, तुळस मंगलतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. हिंदू घरांमध्ये घरोघरी [[तुळशीवृंदावन|तुळशी-वृंदावनात]], कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच. अनेकजण,विशेषतः हिंदू स्त्रिया नित्य नियमाने तुळशीची पूजा करतात. त्यासाठी रोज सकाळी परसदारी तुळशी-वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया [[प्रदक्षणा]] घालतात व सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुलसीपत्र ठेवले जाते.
==तुळस आणि दुर्वा==
गणपतीला तुळस वाहत नाहीत, दुर्वा वाहतात. कारण या दोन्ही वनस्पतींचे गुणधर्म विरुद्ध आहेत.
आयुर्वेदीय ग्रंथ सांगतात -
दुर्वा कषाया मधुराश्च शीता । पित्ततृषारोचक वान्तिहज्यः ॥, तुलसी कटुका तिक्ता हृद्योष्णा दाहपित्तकृत।. म्हणजे दुर्वा या तुरट-गोड तर तुळ्स ही कडू-तिखट. दुर्वा शीत तर तुळस ही हृद्योष्ण. दुर्वा पित्ततृषारोचक म्हणजे पित्त आणि तहान शमवणारी, तर तुळस पित्त आणि भूक वाढवणारी.
दुर्वा आणि तुळस यांचे गुणधर्म विरुद्ध असल्याने पहिली गणपतीला चालत असल्याने दुसरी चालत नाही.
== [[महाराष्ट्रातील आयुर्वेद शिक्षण|आयुर्वेदातील स्थान]] ==
|