"गेळफळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४:
एमेटिक नट (इंग्रजी), पतिरी (उरिया), मंगरी, गेळ (कन्नड), रास, किर्कालू (काश्मीरी), गेली (कोंकणी), मींढळ (गुजराथी), पुंगारै (तामिळ), मरंग (तेलुगू), मेदेळ (नेपाळी), मिंडल (पंजाबी), मेनफल, मदन (बंगाली), मंगकायी (मल्याळम), Randia dumetorum-रेन्डिया ड्युमेटोरम किंवा Catunaregam spinosa (शास्त्रीय नाव), मदन (संस्कृत), मैनफल, मेणफल, करहल (हिंदी).
वर्णन- गेळ हा लहानसर, झाळकट, टणक पुष्कळ फांद्यांनी युक्त असा सुमारे १५ फूट उंचीचा वृक्ष असतो. ह्याच्या खोडावर बोटे-दोन बोटे लांबीचे लहान मोठे मजबूत काटे असतात. पाने गुळगुळीत, चकाकणारी, बोथट, गोल पण देठाकडे आकुंचित अशी असतात. फुले- एकेरी, देठरहित, पांढरी, सुगंधी, फांदीचे टोकास येतात. पुष्पपात्र पाकळ्यांपेक्षा लहान; पाकळ्या लोमयुक्त. ह्या झाडाचे दिसणे व आकारमान हे ठिकाण, हवा, पाणी वगैरेंवर अवलंबून असल्यामुळे ती झाडे वेगवेगळी दिसतात. गेळाचे वृक्ष बहुतेक डोंगराळ प्रदेशात आढळतात. याचे फळ सुपारीएवढें असतें. पिकलेली फळे गोल व पिवळसर तांबूस रंगाची असतात. ती औषधात वापरतात. फळे योग्य वेळी काढून नीट रीतीने वाळवून ठेवावी लागतात. या फळाची भुकटी करुन कोळी लोक नदींत टाकतात.
|