"समुद्रमंथन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
 
== समुद्रमंथनाची कथा ==
महाभारतामध्ये समुद्रमंथनाची कथा आली आहे. ती तेथे जनमेजय राजाने वैशंपायन ऋषींना सांगितली आहे. ही कथा 'अमृतमंथन' या नावाने इंडोनेशियातल्या जावा बेटात लिहिल्या गेलेल्या 'हरिविजय' या काव्यग्रंथातहीकाव्यग्रंथात आहॆआणि भागवत पुराणातल्या अष्टम स्कंधातील सातव्या अध्यायात आहे. ही कथा खालीलप्रमाणे-
 
मेरू नावाच्या एका तेजस्वी पर्वताच्या एका शिखरावर देवतागण एकत्र होऊन अमृतप्राप्तीसाठी चर्चा करत होते. तेव्हा भगवान नारायणांनी देवांना सांगितले," देवांनी आणि दैत्यांनी (दानवांनी) समुद्रमंथन करावे, त्या मंथनातून अमृतप्राप्ती होईल." तेव्हा देवांनी नारायणांच्या सल्ल्यानुसार अकरा सहस्र योजने उंच आणि खोल असलेला मंदार पर्वत उपटून काढण्याचा प्रयत्‍न केला, पण ते शक्य झाले नाही. तेव्हा देवगण परत भगवान नारायण आणि भगवान ब्रह्मदेवाकडे गेले. आणि तेव्हा त्यांनी शेषनागाला मंदाराचल उपटण्यासाठी सांगितले. महाबली शेषनागाने मंदाराचल उपटला. सर्व देवगण मंदाराचलासह समुद्रकिनारी गेले.
ओळ १६:
 
ही आहे समुद्रमंथनाची कथा.
 
==भागवत पुराणातील काही श्लोक==
श्रीशुक उवाच -
 
ते नागराजमामंत्र्य फलभागेन वासुकिम् ।
 
परिवीय गिरौ तस्मिन् नेत्रमब्धिं मुदान्विताः ॥ १ ॥
 
आरेभिरे सुसंयत्ता अमृतार्थे कुरूद्वह ।
 
हरिः पुरस्तात् जगृहे पूर्वं देवास्ततोऽभवन् ॥ २ ॥
 
 
श्री शुकदेवजी सांगतात -
 
परीक्षिता तदा देवे असुरे वासुकीस त्या ।
 
अमृत भाग देण्याचे करोनी मान्य आणिले ॥
 
नेती वासुकिची केली पर्वता वेढिले तये ॥ १ ॥
 
अमृता इच्छुनी सर्व घुसळायासि लागले ।
 
अजीत वासुकीच्या त्या मुखाकडुनि राहता ॥
 
देवता राहिल्या त्याच बाजूने नेति ओढिण्या ॥ २ ॥
 
कुरूद्वह - हे कुरुश्रेष्ठा परीक्षित राजा. मुदान्विताः - आनंदित झालेले. ते - ते देव व दैत्य. फलभागेन - फळांतील भाग देऊ करून. नागराजं वासुकिं. सर्पाचा राजा जो वासुकि त्याला. आमन्त्र्य - बोलावून. (तं) नेत्रं - त्याला दोरी म्हणून. तस्मिन् - त्या. गिरौ - पर्वतावर. परिवीय - गुंडाळून. अमृतार्थं - अमृताकरिता. सुसंयत्ताः - सज्ज झालेले असे. अब्धिं (मथितुं). समुद्राचे मंथन करण्यास. आरेभिरे - आरंभ करिते झाले. हरिः - श्रीविष्णू. पूर्वं - प्रथम. पुरस्तात् - पुढच्या बाजूस. जगृहे - धरिता झाला. ततः - त्याच्या मागोमाग. देवाः - देव. अभवन् - त्या बाजूला झाले. ॥१-२॥
 
श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, समुद्रमंथनातून मिळणाऱ्या अमृतामध्ये तुलाही वाटा मिळेल, असे नागराज वासुकीला वचन देऊन, त्याला दोराप्रमाणे मंदाराचलाला लपेटून घेतले आणि चांगल्या तयारीनिशी त्यांनी आनंदाने अमृत मिळविण्यासाठी समुद्रमंथन करण्यास प्रारंभ केला. त्यावेळी श्रीहरींनी प्रथम वासुकीच्या मुखाची बाजू धरली, म्हणून देवसुद्धा त्या बाजूला गेले. (१-२)
== चौदा रत्ने ==