"बिब्बा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १८:
बिब्ब्याच्या वरच्या भागात अत्यंत दाहक पण विलक्षण गुणकारी तेल असते, ते खूप दाहजनक आहे. बिब्ब्याच्या आतल्या बीमध्ये असलेल्या गोडांबीत खूप पौष्टिक द्रव्ये आहेत. त्याच्या वापराने पुरुषांचे वीर्य चटकन वाढते. बिब्बा हा कटाक्षाने उष्ण प्रकृतीच्या माणसाने कदापि वापरू नये. जेव्हा त्याल नाइलाजाने बिब्बा किंवा बिब्बा घटकद्रव्य असलेले औषध वापरायचे असेल, त्याने आदल्या दिवशी, त्या दिवशी आणि दुसर्या दिवशी जेवणातील मीठ संपूर्णपणे टाळावे, म्हणजे बिब्ब्यातील दाहक तेलाचे दुष्परिणाम होत नाहीत, त्रास होत नाहीत. बिब्ब्याचे औषध घेत असताना कटाक्षाने तूप योग्य प्रमाणात घेतले तर बिब्बा चांगला मानवतो.
एखाद्या रुग्णाला डोक्यात चाई झाल्यास त्या भागाच्या बाजूला सभोवताली भरपूर तूप लावून चाई असलेल्या भागास बिब्ब्याचे तेल लावल्यास दोन ते चार दिवसांत खात्रीने नवीन केस येतात. ज्या मंडळींना शौचास चिकट होत असेल, त्यांच्यासाठी मिठाचे पथ्यपाणी पाळून सेवन राती केलेले भल्लातकहरीतकी चूर्ण गुण देते. ज्यांना कायम दूषित पाणी नाइलाजाने प्यावे लागते, ते भोजनोत्तर भल्लातकासव घेतात. पावसाळय़ात खराब पाणी नाइलाजाने प्यावे लागल्यास बिब्बा हे घटकद्रव्य असलेल्या संजीवनी गोळ्या भोजनोत्तर घेतात..
==बिब्ब्याची फुले==
बिब्बा दाभणास टोचून गोड्या तेलाच्या दिव्यावर धरल्याने जी पेटलेल्या तेलाची टिपे पडतात, त्यास बिब्ब्याची फुले म्हणतात. ही टिपे दुधात धरून हळद व खडीसाखर मिसळून पिण्यास देतात. प्रारंभी एक फूल व मग दोन-चार दिवसांनी दोन फुले रात्री निजताना देतात. हा प्रकार फुफ्फुसाच्याा रोगात देतात. दम्यात याने फार चांगला गुण येतो.
==बिब्बा वापरून बनलेली आयुर्वेदिक औषधे==
संजीवनीवटी, भल्लातकहरीतकी, भल्लातकासव ही बिब्ब्यापासून बनलेली आयुर्वेदिक औषधे आहेत.
|