"बाळ कुडतरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
बाळ कुडतरकर (जन्म : सोनाळे-सिंधुदुर्ग, २१ ऑगस्ट, १९२१) हे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात नोकरी करत. ते आवाजाचे जादुगार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी हजारो जाहिराती व माहितीपटांना आवाज दिला. विविध उत्पादनांच्या जाहिराती, चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी दाखविले जाणारे माहितीपट, शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणार्या जाहिराती, आकाशवाणीवरील कार्यक्रम किंवा चित्रपटाचे डबिंग अशा अनेक ठिकाणी कुडतरकरांनी त्यांच्या भारदस्त आणि दमदार आवाजाच्या जोरावर आपला स्वतंत्र ठसा उमटविला.
[[पार्श्वनाथ आळतेकर]] हे कुडतरकर यांचे आवाजाच्या क्षेत्रातील गुरू व मार्गदर्शक. शब्दोच्चार आणि शुद्ध व प्रमाणित भाषा कशी बोलायची याबाबतीत ते स्वातंत्र्यवीर [[विनायक दामोदर सावरकर]] यांना गुरू मानत. आळतेकर तसेच [[नानासाहेब फाटक]] यांच्या नावाने अनेक वर्षे कुडतरकरांनी एकांकिका स्पर्धांचे आयोजन केले होते. ‘अभिनय’ या नावाची नाट्यसंस्थाही त्यांनी काही काळ चालविली. ‘संगीत अमृतमोहिनी’ हे त्या नाट्यसंस्थेतर्फे सादर झालेले शेवटचे नाटक होय.
बाळ कुडतरकर जेव्हा मुंबईत गिरगावातील ‘राममोहन इंग्लिश स्कूल’मध्ये शिकत होते, त्यावेळच्या एका प्रदशर्नात त्यांनी काढलेल्या चित्रास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यामुळे त्यांच्या चित्रकलेच्या शिक्षकांनी त्यांना जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये जाण्याचा सल्ला दिला. मॅट्रिक पास झाल्यानंतर बाळ कुडतरकरांनी जे.जे.त प्रवेश घेतला. त्यांच्या शाळेतील शिक्षक मोहन नगरकर, यांना कुडतरकर हे शाळेत असताना नाटके-एकांकिका करत असत हे माहिती होते. त्यांच्या शिफारसीमुळे बाळ कुडतरकर यांना रेडिओवरील ‘सभापती’ नावाच्या श्रुतिकेत काम करण्याची संधी मिळाली.
|