"परशुराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १९:
त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले.
त्यानंतर त्यांचा उल्लेख [[सीता]] स्वयंवरात येतो. तेथे त्यांनी शिवधनुष्य
[[चित्र:Ramabhadracharya Works - Painting in Sribhargavaraghaviyam (2002).jpg|250px|right|thumb|राम व परशुरामाची भेट]]
==परशुरामाची मंदिरे==
कोकण प्रदेशाची निर्मितीच्या कथाही तेवढ्याच रंजक आहेत. असे म्हणतात की कोकणाच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र ४०० योजने मागे हटवून केली आहे. म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणांचा देव म्हणतात. संपूर्ण भारतात समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामाची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते. त्यामुळे संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्रे आहेत.
केरळची भूमी परशुरामाने निर्माण केली असे सांगतात.. तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्येही परशुराम क्षेत्र आहे. तसेच ते कोकणातही आहे. परशुराम हा अमर्त्य किंवा चिरंजीव मानला गेला आहे. त्यामुळे त्याचा कायम निवास असतो असा समज आहे. महाराष्ट्रात चिपळूणपासून ४ कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा हायवेवर एक हजार फूट उंचीचा डोंगर आहे. ह्याला महेंद्रगिरी असे नाव आहे. परशुरामाच्या मंदिरामुळे लगतच्या गावालाही परशुराम किंवा लोटे परशुराम असेच म्हणतात.
परशुरामाच्या
एकदा या बेगमेची तारवे समुद्रात बुडाली होती. या बेगमेला समुद्राचा देव म्हणून परशुराम माहिती होता. तिने नवस बोलला की, तारवे परत आल्यास देऊळ बांधीन. त्यानंतर तिची तारवे खरोखरच सुखरूपपणे किनाऱ्याला लागली. परशुरामाचे मंदिर बांधून तिने नवस फेडला.
या मंदिरामध्ये काळ, काम आणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी असलेली परशुरामाची मूर्ती इतर दोन मूर्त्यांपेक्षा उंच आहे. मंदिरातली लाकडावर केलेली कलाकुसर सुरेख आहे, मंदिराचा वार्षिक उत्सव म्हणजे परशुरामाचा जन्मोत्सव. परशुरामाचा जन्म अक्षय्य तृतीयेचा, त्यामुळे अक्षयतृतीयेपासून सुरू होणारा हा उत्सव पुढे तीन दिवस चालतो. यावेळेस मंदिराचा परिसर सुशोभित करण्यात येतो. परशुरामाच्या जन्मोत्सवानिमित्त कीर्तनावे व भजनाचे कार्यक्रम आखले जातात. या मंदिरात महाशिवरात्रीही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याशिवाय परिसरातल्या वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की, मार्गशीर्ष एकादशीला प्रत्यक्ष विठ्ठल पंढरपूरहून महेंद्रगडवर येतो. त्यामुळे मार्गशीर्ष एकादशीला इथे मोठी यात्रा भरते. परिसरातले वारकरी त्यादिवशी इथे दर्शनाला येतात. कोकणचा सर्वांग सुंदर निसर्ग, दूरवर
उत्तर प्रदेशातील गढवालमधील जौनपूर बावर येते ४०० वर्षं प्राचीन परशुराम मंदिर आहे.
परशुराम हे विष्णूच्या दशावतारामधील एक अवतार आहेत. त्यांनी पृथ्वीवरील अधर्मी क्षत्रियांचा संहार केला आहे. त्यांच्या दानशीलतेवर प्रसन्न होऊन विष्णूने त्यांचा द्वारपाल होणे पसंत केले.
परशुरामाच्या मृत्यूचा कोणत्याही ग्रंथात उल्लेख आला नसल्याने परशुराम हे चिरंजीव (अमर) समजले जातात.▼
==शरादपि शापादपि==
Line ४१ ⟶ ४२:
अर्थः चार वेद मुखोद्गत आहेत (संपूर्ण ज्ञान) आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे (शौर्य) - म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्याने शाप अणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो [तो परशुराम].
==चिरंजीव परशुराम==
▲परशुरामाच्या मृत्यूचा कोणत्याही ग्रंथात उल्लेख आला नसल्याने परशुराम हे चिरंजीव (अमर) समजले जातात.
==परशुरामावरील पुस्तके==
* परशुधारी परशुराम (सुधाकर शुक्ल)
* भारतीय संस्कृतीचे शिल्पकार युगपुरुष परशुराम ([[शुभांगी भडभडे]])
* भृगुनंदन (७०० पानी पुस्तक, लेखिका भारती सुदामे)
|