"नृसिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५४:
==नरसिंह पुराण==
नृसिंहाच्या कथेवर नरसिंह पुराण हे इसवी सनाच्या पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिले गेलेले एक उपपुराण आहे. या पुराणात ६८ अध्याय असून एकूण ३४६४ श्लोक आहेत. हे पुराण [[व्यास (नि:संदिग्धीकरण)|भगवान व्या]]सांनी लिहिले असे समजले जाते.
 
==नृसिंहशिल्पे==
नृसिंहाच्या मूर्ती भारतातील अनेक देवालयांत आहेत. त्यांपैकी काही देवालये ही :-
* नृसिंहाची प्राचीन सिंहरूपातील प्रतिमा आंध्र प्रदेशातल्या [[गुंटूर]] जिल्ह्यातील कोंडामठ येथील एका शिल्पपटात आहे.
* [[पुणे]] जिल्ह्यातील रांजणी गावात ब्रह्मे नावाच्या ब्राह्मणाच्या घरी नृसिंह केवळ चतुष्पाद सिंहाच्याच रूपात आहे.
* [[परभणी]] जिल्ह्यातल्या पिंगळी येथे उडत्या गरुडाच्या पाठीवर बसलेला नृसिंह आहे.
* [[वेरूळ]]च्या १५ व १६व्या लेण्यांत नृसिंह-हिरण्यकश्यपू युद्धाचा प्रसंग दर्शविला आहे. तसेच शिल्प बीड्जिल्ह्यातील धर्मपुरी येथील केदारेश्वराच्या देवळात आहे.
* पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील भीमा-नीरा संगमाजवळच्या भग्न देवळाच्या गाभार्‍यात वीरासनातील नृसिंहाची द्विभुज मूर्ती आहे. डावीकडे लक्ष्मीचे स्वतंत्र देऊळ आहे.
* सांगली जिल्ह्यातल्या वाळवे तालुक्यातील कोळे नरसिंहपूरगावी कृष्णा नदीकाठच्या देवळात.
* शिवाय, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, अंजी, नांदेड, पुसद, पैठण, पोरवर्णी, बेळकोणी, रत्‍नागिरी जिल्ह्यातले संगमेश्वर, रामटेक, राहेर, शेळगाव आणि, सातारा जिल्ह्यातील धोम येथे नृसिंहाची शिल्पे आहेत.
 
 
 
{{दशावतार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/नृसिंह" पासून हुडकले