"श्रीपाद ब्रह्मे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: श्रीपाद ब्रह्मे हे एक मराठी ललित लेखक आहेत. त्यांची चित्रपट आणि च... |
No edit summary |
||
ओळ १:
श्रीपाद ब्रह्मे हे एक मराठी ललित लेखक आहेत. त्यांची चित्रपट आणि चित्रपटसृष्टी या विषयावर लिहिलेली दोन पुस्तके आहेत. ते २००५ सालापासून सातत्याने सिनेपरीक्षण करणारे व सन १९९६पासून वृत्तपत्र सदरांतून दर्जेदार लेखन उत्तमरीत्या करणारे पत्रकार आहेत. त्यांच्या एकूण
श्रीपाद ब्रह्मे यांच्या आईचे बालपण मराठवाड्यातल्या छोट्या-मोठ्या गावांत गेले. तिचे वडील बार्शी किंवा सोलापुरात नेऊन सिनेमे दाखवत असत. एकदा तर तिने सलग तीन शो पाहण्याचा पराक्रम केला. सिनेमाची हीच आवड श्रीपाद ब्रह्मे यांच्यात उतरली असावी.
ब्रह्मे यांचे बालपण अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेडमध्ये गेले. वडील एसटीत कामाला होते आणि एसटी स्टँडच्या समोर दत्त नावाचे टूरिंग टॉकीज होते. तिथे ब्रम्ह्यांना खूप चित्रपट बघायला मिळाले. पण असे असले, तरी त्यांची सिनेमाची आवड इतर चारचौघांसारखीच होती. मात्र त्यांना सिनेमांविषयी वाचायला आवडत असे. पुढे पुण्याला आल्यावर ते गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकच्या होस्टेलवर राहत असत. त्या वेळी [[जब्बार पटेल]]ांचा 'मुक्ता' हा सिनेमा आला होता. तो बघून होस्टेलवर आल्यानंतर त्यांनी त्या चित्रपटविषयी एक फुलस्केप पान भरून लिहून काढले, तेच श्रीपाद ब्रह्मे यांचे पहिले चित्रपट परीक्षण.
ब्रह्मे यांनी यानंतर रानडे इन्स्टिट्यूटमध्ये जर्नालिझम विभागात पदवीसाठी प्रवेश घेतला. तेथे त्यांना सिनेमाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. दैनिक 'सकाळ'मध्ये रुजू झाल्यावर रिपोर्टिंगच्या निमित्ताने त्यांना फिल्म इन्स्टिट्यूट, फिल्म आर्काइव्ह येथे जायला मिळू लागले; पुण्यात भरणार्या चित्रपट महोत्सवांत सिनेमे पाहायची संधी मिळू लागली. आणि काही काळानंतर त्यांन 'सकाळ'मध्ये चित्रपट परीक्षणे लिहायला मिळाली. ब्रह्मे यांनी लिहिलेले पहिले परीक्षण ‘अनाहत' या चित्रपटाचे होते. हे परीक्षण सप्टेंबर २००३ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी पुढची सात वर्षं हिंदी-मराठी अशा १७५ चित्रपटांची परीक्षणे 'सकाळ'मध्ये लिहिली.
नंतर ब्रह्मे 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये आले. पहिल्या आठवड्यापासूनच पुढे सतत चार वर्षे त्यांनी परीक्षणे लिहिली आणि मग ते स्वतःच त्यातून निवृत्त झाले. 'पीके' चित्रपटाचे परीक्षण डिसेंबर २०१४मध्ये प्रसिद्ध झाले. तेच त्यांचे महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेले शेवटचे परीक्षण. श्रीपाद ब्रह्मे यांनी अकरा वर्षांत ३०७ चित्रपटांची परीक्षणे लिहिली.
==श्रीपाद ब्रह्मे यांनी लिहिलेली पुस्तके==
|