"मधुकर विश्वनाथ लिमये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मधुकर विश्वनाथ लिमये (जन्म : इ.स. १९२४; मृत्यू : ४ नोव्हेंबर, इ.स. २०१५) हे ईशान्य भारतातल्या आसामच्या निरनिराळ्या भागांमध्ये ६० वर्षे वस्तव्य करून राहिलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. एखाद्या सेवाव्रती व्यक्तीप्रमाणे त्यांनी संघाचे कार्य तेथे रुजवले अणि वाढवले. तेथील तळागाळातील लोकांना भारतीयांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व तेथील जीवनमान उंचवण्यासाठी संघाकडून होत असलेल्या कार्यात त्यांचे मोठे योगदान होते.
 
मुंबईत गिरगावात रहात असताना मधुकर लिमये अगदी लहान वयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. मुंबई विद्यापीठातून १९४८ साली एम.एस्‌सी. झाल्यावर त्यांनी संघाच्या पूर्णवेळ प्रचारकाचे काम स्वीकारले. त्यांना महाराष्ट्राच्या पालघर तालुक्यात काम करायला पाठविण्यात आले. दोनच वर्षांनी म्हणजे १९५० साली मधुकररावांना संघकार्यासाठी ईशान्य भारतात पाठविले गेले. संघावर बंदी असलेल्या कालखंडात ईशान्य भारताच्या दुर्गम भागांत आणि भारतीय उपखंडातील लोकांपासून मनाने दुरावलेल्या लोकांच्या प्रदेशात, त्यांनी नौगाव या छोट्या शहरापासून अत्यंत खडतर वातावरणात आपल्या कार्याला सुरुवात केली, आणि त्यानंतर कोणतेही स्वयंचलित वाहन हातात नसताना आणि सार्वजनिक वाहतुकीची कोणतीही सोय नसताना, केवळ सायकलीवरून आसामच्या दूरदूरच्या कोपर्‍यांपर्यंत पोहोचून मधुकर लिमयेंनी संघ प्रचारकाचे काम आणि अन्य समाजकार्य केले. आसाम हे त्यांचे मूळ घरच झाले होते.
 
मधुकर विश्वनाथ लिमये यांना मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी या भाषा उत्तम येत असत. आसामात गेल्यावर ते बंगाली आणि आसामी भाषा शिकले. मधुकर लिमये स्वतः: एक प्रतिभावान कवी असून संवेदनशील लेखक होते. त्यांनी आसामी भाषेत ‘अलोक’ नावाचे साप्ताहिक सुरू केले. ते [[गोहत्ती]]हून प्रसिद्ध होत असे.
 
मधुकर लिमये यांनी आपल्या अनुभवांवर आधरित ‘खट्टी मिठ्ठी यादे’ नावाचे हिंदी पुस्तक लिहिले आहे. त्याचा ’आंबट गोड आठवणी’ नावाचा मराठी अनुवाद कु. शिल्पा शशिकांत वाडेकर यांनी केला आहे.
Line १३ ⟶ १७:
अन्य भारतीयांच्या मनात ईशान्येकडील राज्यांतील रहिवाश्यांबद्दल आपलेपणाची भावना रूजविण्यासाठी या आठवणी उपयुक्त आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य, त्याचे महत्त्व आणि स्वसुखावर तुळशीपत्र ठेवून राष्ट्रभक्तीसाठी त्याग करणार्‍या प्रचारकांचे जीवन याची माहिती या आठवणीतून मिळते.
 
==पुरस्कार==
* उत्तर प्रदेश सरकारने तत्काली पंतप्रधान [[अटलबिहारी वाजपेयी]] यांच्या हस्ते मधुकररावांना साहित्यिक पुरस्कार दिला.
* ‘माय होम इंडिया’ने त्यांना ‘वन्‌ इंडिया पुरस्कार’ दिला.