"झिबिग्न्यू ब्रेझिन्स्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: झिबिग्न्यू ब्रेझिन्स्की (Zbigniew Brzezinski) (जन्म : वॉर्सा-पोलंड, २८ मार्च, इ....
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
तरुण झिबिग्न्यू कॅनडातून पदवीधर झाले व नंतर अमेरिकेत स्थलांतर झाल्याने त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. तेथे तत्कालीन सोव्हिएट रशियाचे गाढे अभ्यासक मर्ल फेन्सोड हे त्यांचे मार्गदर्शक होते. त्यामुळे नकळतपणे ब्रेझिन्स्की यांचाही रशिया हा अभ्यासाचा विषय बनला.
 
==अध्यापन आणि लेखन==
आधी हॉर्वर्डमध्ये आणि नंतर कोलंबिया विद्यापीठात ब्रेझिन्स्की यांनी अध्यापन सुरू केले. या काळात त्यांचे सोव्हिएट रशियाविषयक नमित्तिक लिखाण सुरूच होते. त्यामुळे ब्रेझिन्स्की रशिया विशेषज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले.
 
==पीसफुल एंगेजमेन्ट==
१९६५ साली एका आंतरराष्ट्रीय विषयांवरील परिषदेत झालेल्या परिसंवादात बोलतान सोव्हिएट रशियाविषयी भाष्य करताना ब्रेझिन्स्की यांनी ‘पीसफुल एंगेजमेंट’ असा शब्दप्रयोग केला, तो पुढे रूढ झाला. ‘आपल्या शत्रूला निष्प्रभ करण्यासाठी त्याला प्रेमाने कवेत घेणे हादेखील प्रभावशाली मार्ग असू शकतो,’ हे त्यांचे त्यावर स्पष्टीकरण. तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी पीसफुल एंगेजमेन्ट हा शब्दप्रयोग आपल्या परराष्ट्र धोरणासाठी जसाच्या तसा उचलला आणि ब्रेझिन्स्की यांचे महत्त्व अचानक वाढले.
 
==जिमी कार्टर यांचे सुरक्षा सल्लागार==
अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक जिंकल्यावर अध्यक्ष जिमी कार्टर यांनी ब्रेझिन्स्की यांची सुरक्षा सल्लागारपदावर नेमणूक केली.
 
==परराष्ट्र धोरणाला दिशा==
ब्रेझिन्स्की आणि माजी परराष्ट्रमंत्री हेन्‍री किसिंजर ही अमेरिकेच्या परराष्ट्र राजकारणास दिशा देणारी प्रभावी जोडी होती. अमेरिकेचे चीनबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्यामागे ब्रेझिन्स्की यांचा हात होता.
 
अफगाणिस्तानात रशियाचे ‘व्हिएटनाम’ करण्याची संधी आहे हे अमेरिकी अध्यक्षांना समजावणारे ब्रेझिन्स्कीच होते.
 
त्या काळात ब्रेझिन्स्की यांनी अध्यक्ष कार्टर यांच्यासाठी पश्चिम आशियासाठीचे संपूर्ण धोरणच तयार केले. या परिसरात हातपाय पसरणार्‍या रशियाला रोखायचे असेल तर पूर्व युरोप आणि पश्चिम आशियातील मुस्लिमबहुल देशांतील नेत्यांची कमान (आर्क ऑफ इस्लाम) बांधावी ही ब्रेझिन्स्की यांचाच सल्ला. अश्या नव्या कल्पना ब्रेझिन्स्की यांनी मांडल्या आणि युद्धखोरीला विरोध कायम ठेवून ‘पीसफुल एंगेजमेंट’चा पुरस्कार केला.