"जास्वंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५६:
 
जास्वंदवर्गीय वनस्पतींचे सुमारे सव्वादोनशे प्रकार आहेत. त्यातील काही पाच-सहा मीटर उंच वाढतात. उंच वाढणार्‍यांत "हिबिस्कस कॅनाबिनस' ही जात असून, ती त्याच्या लाकडासाठी प्रसिद्ध आहे. भरपूर सेल्युलोजयुक्त कर्बोदके असलेल्या या वनस्पतीला "केनाफ' म्हणतात आणि कागदनिर्मितीच्या उद्योगात तो एक महत्त्वाच कच्चा माल आहे. काही प्रकारांमधील फुलांना मंद सुगंध असतो. तागाच्या वनस्पतीचे जसे तंतू निघतात, त्याप्रमाणे "हिबिस्क्‍स सब्दारिफा' या वाणाचेही शोभिवंत धागे निघतात. काही देशांमध्ये त्याचा स्कर्ट बनवतात. तसेच धाग्यांचा उपयोग केसांचा टोप बनविण्याकरितादेखील केला जातो.
 
==उपयोग==
जास्वंदीच्या फुलांचा उपयोग केस धुण्यासाठी होतो. जास्वंदीच अर्क घातलेले केशतेल जबाकुसुम म्हणून प्रसिद्ध आहे. शाम्पूमध्ये एक घटक म्हणून जास्वंदीच्या पाना-फुलांच्या अर्काचा समावेश होतो. इजिप्तमध्ये ते लघवी साफ होण्यासाठी डाययुरेटिक (मूत्रल) म्हणून वापरतात. इराणमधील वैद्य रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी एक घटक म्हणून त्याचा वापर करतात. ही वनस्पती एक सौम्य रेचक म्हणूनही उपयोगात येते. नायजेरियात पोट साफ करण्यासाठी, तर काही देशांमध्ये चक्क भाजी करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. अनेक महिला फुलांमधील नानाविध रंग सरबतांसाठी किंवा जाम-जेलीसारख्या खाद्यपदार्थांमध्येही वापरतात. काही फुलांचा रंग उकळत्या पाण्यात बाहेर पडतो. मेक्‍सिकोमध्ये तर जास्वंदीच्या वाळलेल्या फुलांपासून एक चविष्ट खाद्यपदार्थ तयार केला जातो.
 
जास्वंदाचा समावेश असलेल्या चहाच्या डिप-डिप पुड्या हा एक फार मोठी जागतिक बाजारपेठ लाभलेला व्यवसाय आहे. चहाला लालसर किंवा पिवळसर रंग प्राप्त व्हावा म्हणून वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचा वापर केला जातो. याचे रंगीत पेय हे शीत किंवा गरम पेय म्हणून वापरता येतं. या गरम पेयामार्फत सूक्ष्म प्रमाणात लोह, ताम्र, जस्त (झिंक), ब-१, ब-२ आणि क ही जीवनसत्त्त्वे शरीराला मिळू शकतात. या पेयाच्या सेवनामुळे अपायकारक लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल कमी होते आणि हितकारक हाय डेन्सिटी कोलेस्टेरॉल वाढते. तसेच रक्तशर्करा, रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. हे पेय पाचक आहे. ज्याला तीव्र उदासीनतेची बाधा झाली आहे, त्यांच्यासाठी जास्वंदयुक्त चहा गुणकारी असल्याचे निष्कर्ष प्राप्त झालेले आहेत. जास्वंदीच्या फुलांचे असे काही गुणधर्म आधीपासूनच माहिती झालेले असले, तरी त्यासंबंधीचे सखोल संशोधन चालूच असते. जास्वंदीमुळे चहाला लाल किंवा पिवळसर रंग येण्याचे कारण म्हणजे फुलात असलेली फ्ल्याओनाईड, डेल्फिनिडिन, सायनिडिन, अन्थोसायनिंस ही सेंद्रिय द्रव्ये.. शरीरातच तयार होणारी फ्री-रॅडिकलवर्गीय रसायने निष्प्रभ करणे गरजेचे असते. त्याकरिता हिबिस्कसच्या चहात जे प्रोटोकॅटेचुइक आम्ल असते, ते अॅन्टि-ऑक्‍सिडन्ट म्हणून उत्तम कार्य करते.
 
== चित्रदालन(वेगवेगळ्या रंगाचे जास्वंद) ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जास्वंद" पासून हुडकले