"केळकर संग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छो 117.195.83.150 (चर्चा) यांनी केलेले बदल EmausBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदा... |
No edit summary |
||
ओळ १:
[[चित्र:Raja Dinkar Kelkar Museum.jpg|right|250px|thumb|राजा दिनकर केळकर संग्रहालय]]
[[पुणे|पुण्यामध्ये]] ‘राजा दिनकर केळकर संग्रहालय’ नावाचे एक वस्तुसंग्रहालय आहे. हे संग्रहालय दिनकर गंगाधर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी या गृहस्थाने उभारले. संग्रहालयाला दिनकर केळकर यांच्या राजा नावाच्या अल्पावयात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव दिले आहे. राजा केळकर संग्रहालयातील ऐतिहासिक वस्तू दिनकर केळकरांच्या अचाट परिश्रमाची जाणीव करून देतात. राजाश्रयाशिवाय केवळ एक व्यक्ती असा अफाट संग्रह उभा करू शकतो हे केळकरांनी सर्व जगाला दाखवून दिले.
आपले पिढीजात चष्म्याचे दुकान चालवताना दिनकर केळकरांना जुन्या सरदार घराण्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू जमवण्याचा छंद जडला. अगदी फुंकणीपासून ते अत्तरदाणीपर्यंत त्यांनी रोजच्या वापरातील नाना चीजा जमा केल्या. विविध प्रकारचे दिवे, अडकित्ते, गंजीफा, सोंगट्या, शस्त्रे, पानदाने, पेटारे, दरवाजे, मूर्ती, कात्र्या, कळसूत्री बाहुल्या अशांनी केळकरांचा खजिना समृद्ध, संपन्न होऊ लागला. कोथरूड येथून त्यांनी मस्तानीचा महाल उचलून आणला आणि संग्रहालयात हुबेहूब तसा उभा केला.
१९२२ साली एका खोलीच सुरू झालेला या अद्भुत संग्रहालयाच संसार, वाड्याच्या सार्या दालनांतून फोफावला आणि त्याची कीर्ती परदेशापर्यंत पोचली. राणी एलिझाबेथ यांनीही संग्रहालयातले हे वस्तुवैभव पाहून आनंदोद्गार काढले होते. केळकरांनी कधीच पैशाची पर्वा केली नाही. या छंदासाठी त्यांनी पत्नीचे दागिने विकले, एवढेच नव्हे तर पत्नीला वारसाहक्काने मिळालेले करमाळ्याचे घरही विकले.
==कवी अज्ञातवासी==
दिनकर गंगाधर केळकर म्हणजे मराठीत अज्ञातवासी या नावाने कविता करणारे कवी होत. [[राम गणेश गडकरी]] हे त्यांचे काव्यगुरू होते.
==दिनकर केळकर यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ बांधलेला वैशिष्ट्यपूर्ण स्तूप==
पुण्यातील [[बालगंधर्व]] रंगमंदिराशेजारच्या ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलाखाली एक वैशिष्ट्यपूर्ण स्तूप आहे. पुलापासून मुठा नदीच्या उजव्या तीरावरून [[शनिवारवाडा|शनिवारवाड्याच्या]] दिशेने जाताना उजव्या बाजूस हा स्तूप दिसतो. हा स्तूप कुणा कुशल कारागीराने तयार केला असे जाणवते. हा दगडी स्तूप तळाशी चौकोनी असून, त्यावर दोन अष्टकोनी टप्पे आणि सर्वात वरती शिवलिंग आहे. बा्जूला चार स्तंभ असून त्यावर सोळा मूर्ती आहेत. पायाशी कासव, शंख आदी शुभचिन्हे आहेत.
कोनशिलेवरील माहितीनुसार हा स्तूप गंगाधर केळकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या दहनभूमीवर त्यांच्या दिनकर आणि भास्कर या दोन मुलांनी १९२८मध्ये उभारला. गंगाधर केळकर यांचे निधन २० ऑगस्ट १९२८ रोजी झाले. त्यावेळी ते पुण्यात ‘शांतिकुंज, जुन्या जाईच्या गेटाजवळ, सदाशिव पेठ’ येथे रहात होते.
== संदर्भ ==
|