"रीमा लागू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३८:
==अभिनयाची व्यावसायिक कारकीर्द==
रीमा लागू यांनी जाहिरातींमधून अभिनय क्षेत्राशी पहिली ओळख करून घेतली. महेश कोठारे यांच्यासोबत त्यांनी जाहिरातींमध्ये काम केले. ‘हा माझा मार्ग एकला’मध्येही त्यांनी लहानशी भूमिका केली होती. मात्र ती भूमिका फार प्रकाशात आली नाही. त्यांनी मास्टरजी या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. काही काळ रंगभूमीवरही त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. मात्र नंतर बराच काळ त्या अभिनय क्षेत्रापासून लांब होत्या. बालकलाकार म्हणून ‘दृष्टी आहे जगाची निराळी’ या चित्रपटातही त्यांनी महेश कोठारेंसोबत अभिनय केला. मात्र तो प्रदर्शित होऊ शकला नाही.
त्यानंतर लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. १९७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या.▼
नाट्य अभिनेते [[विवेक लागू]] यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांचे नाव रीमा लागू झाले.▼
रीमा लागू यांनी गुजराथी नाटकांतून, तसेच कन्नड आणि भोजपुरी चित्रपटांमधूनही काम केले. १९८०-९०च्या दशकामध्ये आमीर खान, सलमान खान, करीश्मा कपूर या अभिनेत्यांचा उदय होत असताना त्यांना आईच्या भूमिका मिळायल्या लागल्या आणि त्यांनी गरीब बापुडवाण्या आईला ग्लॅमरस रूप दिले. कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया, साजन, वास्तव, कुछ कुछ होता है अशा चित्रपटांमधून एक नवी आई प्रेक्षकांना दिसली. मैंने प्यार किया, साजन, हम साथ साथ हैं, जुडवा, पत्थर के फूल, शादी करके फस गया यार, निश्चय, कहीं प्यार ना हो जाए यांसारख्या सिनेमांमध्ये रीमा यांनी सलमान खानच्या आईची भूमिका साकारली आहे.
रीमा लागू यांनी आरके बॅनरसोबत हीना या चित्रपटातही भूमिका केली. खानदान, श्रीमान श्रीमती, तू तू मै मै या मालिकांनी त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. तू तू मै मै या विनोदी मालिकेला प्रेक्षक आजही पसंत करतात.
▲त्यानंतर लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. १९७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या.
▲नाट्य अभिनेते [[विवेक लागू]] यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांचे नाव रीमा लागू झाले.
==रीमा लागू यांनी भूमिका केलेली नाटके==
|