"गजमल माळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३३:
'''गजमल माळी''' (जन्मः [[इ.स. १९३४]]) हे [[मराठी]] भाषेतील [[लेखक]], [[कवी]] व [[नाटककार]]
प्राचार्य गजमल माळी हे सत्यशोधक समाजाचे खंदे कार्यकर्तेही होते.
अजिंठा लेण्यांच्या परिसरात फुललेली रॉबर्ट गिल (अजिंठा लेणी प्रकाशात आणणारे ब्रिटिश अधिकारी) आणि पारो यांची प्रेमकहाणी ‘कल्पद्रुमाची डहाळी’ या नाटकातून गजमल माळींनी लिहिली. तिच्यावरून ‘पारू’ हा चित्रपट निघाला.
गजमल माळी ह्यांचा ‘राष्ट्रीय काँग्रेस आणि सत्यशोधक समाज’ हा त्यांचा वैचारिक ग्रंथ काँग्रेस आणि सत्यशोधक समाज यांच्या संबंधांवर प्रकाश टाकतो. या पुस्तकातून बराचसा अज्ञात इतिहास समाजासमोर आला आहे. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात बहुजन समाज काँग्रेसकडे कसा वळला आणि त्याचे हे वळणे ही सामाजिक अभिसरणाची सुरुवात कशी होती, याचे विवेचन प्रा. माळी यांनी या वैचारिक ग्रंथातून केले आहे.
प्राचार्य गजमल माळी हे ‘राजकीय सत्तांतर’ या सामाजिक-राजकीय विषयाला वाहिलेल्या साप्ताहिकाचे संस्थापक-संपादक होते. सत्यशोधक चळवळीतील उपेक्षित, समर्पित कार्यकर्त्यांची त्यांनी आदरपूर्वक दखल घेतली. ते केवळ लेखक नव्हते, तर चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते.
==जीवन==
|