</div>
'''सूर्यमाला''' ही [[सूर्य|सूर्याच्या]] [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वाकर्षणामुळे]] त्याच्या भोवती फिरणार्याफिरणाऱ्या [[:वर्ग:खगोलीय वस्तू|खगोलीय वस्तूंनी]] बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य [[ग्रह]], त्यांचे आत्तापर्यंत माहीत झालेले १६५ चंद्र [[नैसर्गिक उपग्रह]],<ref>{{संकेतस्थळ स्रोत| शीर्षक= The Jupiter Satellite Page{{मृत दुवा}}|लेखक=Scott S. Sheppard|कृती=University of Hawaii|दुवा=http://www.ifa.hawaii.edu/~sheppard/satellites/|अॅक्सेसदिनांक=2006-07-23}}</ref> ५ [[बटुग्रह|बटु ग्रह]] ([[प्लूटो (बटु ग्रह)|प्लूटो]]सकट), तसेच असंख्य [[सूर्यमालेतील छोट्या वस्तू|छोट्या वस्तू]] यांचा समावेश होतो. छोट्या वस्तूंमध्ये [[उल्का]], [[धूमकेतू]], [[कायपरचा पट्टा]], [[लघुग्रहांचा पट्टा]] तसेच [[ऊर्टचा मेघ]] यांचा समावेश होतो.
सर्वसाधारपणे, सूर्यमालेत एकंदर पुढील विभाग करण्यात येतात - सूर्य, ४ अंतर्ग्रह, लघुग्रहांचा पट्टा, ४ बाह्य वायुमय वायू ग्रह व कायपरचा पट्टा. कायपरचा पट्ट्यापुढे अतिशय विखुरलेली चकती व शेवटी ऊर्टचा मेघ.
== वर्गीकरण ==
सूर्याभोवती फिरणार्याफिरणाऱ्या खगोलीय वस्तूंचे तीन मुख्य वर्गात वर्गीकरण केले जाते : ग्रह, लघुग्रह व सूर्यमालेतील छोट्या वस्तू. जिला इतके [[वस्तुमान]] आहे की ती स्वत:च एका गोलात रूपांतरित होऊ शकते अशा वस्तूला [[ग्रह]] हे नाव दिले जाते. ग्रहाच्या जवळील अवकाशात सूर्याभोवती फिरणार्याफिरणाऱ्या इतर [[सूर्यमालेतील छोट्या वस्तू|छोट्या वस्तू]] नसतात. या व्याख्येप्रमाणे सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत - [[बुध ग्रह|बुध]], [[शुक्र]], [[पृथ्वी]], [[मंगळ]], [[गुरु]], [[शनी]], [[युरेनस]] व [[नेपच्यून]].
[[ऑगस्ट २४]] [[इ.स. २००६|२००६]] रोजी [[आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना|आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेने]] ''([[w:International Astronomical Union|International Astronomical Union]])'' ग्रहांची नवीन व्याख्या बनविली व त्यानुसार [[प्लूटो (बटु ग्रह)|प्लूटो]]चे वर्गीकरण ग्रहांमधून [[लघुग्रह|बटुघुग्रहामध्ये]] करण्यात आले. त्याच वेळी [[सेरेस]] व [[एरिस (बटु ग्रह)|एरिस]] यांनाही बटुग्रहांचा दर्जा दिला गेला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://news.bbc.co.uk/1/hi/magazine/4737647.stm | शीर्षक=Farewell Pluto? | आडनाव=Akwagyiram | पहिलेनाव=Alexis | प्रकाशक=BBC News | दिनांक=2005-08-02 | अॅक्सेसदिनांक=2006-03-05}}</ref>
एका बटुग्रहाजवळील अवकाशात इतर खगोलीय वस्तूंचे अस्तित्व असू शकते. लघुग्रहांमध्ये गणना होणार्याहोणाऱ्या इतर खगोलीय वस्तू म्हणजे [[सेडना]], [[ऑर्कस]] व [[क्वाओर]].
प्लूटो हा त्याच्या शोधापासून (म्हणजेच [[इ.स. १९३०|१९३०]] पासून) सूर्यमालेतील नववा ग्रह मानला जात होता. पण [[:वर्ग:इ.स.चे २० वे शतक|२० व्या शतकाच्या शेवटी]] सूर्यमालेतील बाहेरच्या भागात प्लूटो सारख्याप्लूटोसारख्या अनेक वस्तू शोधण्यात आल्या. यापैकी मुख्य म्हणजे प्लूटोपेक्षा आकाराने मोठा असणारा एरिस.
सूर्याभोवती फिरणार्याफिरणाऱ्या इतर खगोलीय वस्तूंना एकजात [[सूर्यमालेतील छोट्या वस्तू|छोट्या वस्तू]] असे म्हणतात. सूर्यमालेतील ज्या खगोलीय वस्तू सूर्याभोवती न फिरता ग्रह, लघुग्रह अथवा छोट्या वस्तूंभोवती फिरतात, त्यांना [[नैसर्गिक उपग्रह]] किंवा चंद्र म्हणतात.<ref name="FinalResolution">{{स्रोत बातमी | शीर्षक = The Final IAU Resolution on the definition of "planet" ready for voting | प्रकाशक = IAU | date = 2006-08-24 | दुवा = http://www.iau.org/iau0602.423.0.html | अॅक्सेसदिनांक = 2007-03-02}}</ref>
प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरताना लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. त्यामुळे ग्रहाच्या एका प्रदक्षिणेदरम्यान त्याचे सूर्यापासूनचे अंतर बदलत राहते.
| अॅक्सेसदिनांक=2006-07-22}}</ref> उरलेल्या वस्तुमानाच्या ९०% पेक्षा अधिक वस्तुमान हे गुरू व शनी या ग्रहांमध्ये आहे.
सूर्याभोवती फिरणार्याफिरणाऱ्या जवळजवळ सगळ्या मोठ्या वस्तू एकाच पातळीत सूर्याभोवती फिरतात. ग्रहांची परिभ्रमणाची पातळी ही पृथ्वीच्या भ्रमणाच्या पातळीच्या जवळपास आहे तर [[धूमकेतू]] व [[कायपरचा पट्टा]] यांची परिभ्रमणाची पातळी ही पृथ्वीच्या भ्रमणाच्या पातळीशी काही अंशांचे कोन करते.
[[चित्र:Oort cloud Sedna orbit.jpg|thumb|सूर्यमालेतील वस्तूंच्या सूर्याभोवती फिरण्याच्या पातळी (परिमाणात)]]
सूर्याच्या भोवती फिरणारे ग्रह व इतर अनेक वस्तू या सूर्याभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात. याला काही अपवाद आहेत, उदा. [[हॅले धूमकेतू]].
सूर्याच्या भोवती फिरणार्याफिरणाऱ्या वस्तू या [[केप्लरचा सिद्धान्त|केप्लरच्या सिद्धान्ता]]प्रमाणेच फिरतात. प्रत्येक वस्तू ही एका लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते. त्या कक्षेच्या एका केंद्रस्थानी सूर्य असतो. सूर्याच्या जितक्या जवळ ती वस्तू येईल, त्याप्रमाणात तिचा फिरण्याचा वेग वाढतो. ग्रहांच्या कक्षा या जवळ जवळ वर्तुळाकार आहेत (म्हणजे दोन्ही केंद्रस्थाने खूप जवळ आहेत), तर धूमकेतू व कायपरचा पट्ट्यातील काही वस्तूंच्या कक्षा या फारच लंबवर्तुळाकार आहेत.
सूर्यमालेत असणारी खूप लांब अंतरे दाखविण्यासाठी अनेक जण ग्रहांच्या कक्षा या सारख्या अंतरावर दाखवितात. पण प्रत्यक्षात मात्र ग्रह सूर्यापासून जितका दूर तितकीच आधीच्या ग्रहापेक्षा त्याची कक्षा लांब अंतरावर आढळते. उदा. शुक्र हा बुधापासून ०.३३ AU अंतरावर आहे, तर शनी हा गुरूपासून ४.३ AU इतका दूर आहे. तसेच नेपच्यूनची कक्षा ही युरेनसपेक्षा १०.५ AU इतक्या अंतरावर आहे. अनेक जणांनी या अंतरांमधील संबंध शोधण्याचे प्रयत्न केले आहेत, पण अजूनतरी याबद्दल समाधानकारक स्पष्टीकरण उपलब्ध नाही.
[[चित्र:Protoplanetary-disk.jpg|left|thumb|चित्रकाराच्या नजरेतून सूर्यमाला]]
[[चित्र:M42proplyds.jpg|left|thumb|ओरायन नेब्युलातील तबकडीचे [[हबल दुर्बिण|हबल दुर्बिणीने]] घेतलेले छायाचित्र]]
सूर्यमालेची निर्मिती ही [[तेजोमेघ सिद्धान्त|तेजोमेघ सिद्धान्ता]]प्रमाणे झाली असल्याचे खगोलशास्त्रज्ञ मानतात. या सिद्धान्ताप्रमाणे ही निर्मिती एका मोठ्या रेणूंच्या ढगाच्या कोसळण्यामुळे सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी झाली. हा रेणूंचा ढग कित्येक [[प्रकाशवर्ष]] अंतरावर पसरला होता व त्यापासून अनेक तार्यांचीताऱ्यांची निर्मिती झाली.<ref name="Arizona">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=Lecture 13: The Nebular Theory of the origin of the Solar System|दुवा=http://atropos.as.arizona.edu/aiz/teaching/nats102/mario/solar_system.html|कृती=University of Arizona|अॅक्सेसदिनांक=2006-12-27}}</ref> जुन्या [[धूमकेतू|धूमकेतूंचा]] अभ्यास केला असता, त्यांच्यावर फक्त मोठ्या फुटणार्याफुटणाऱ्या तार्याच्याताऱ्याच्या गाभ्यात आढळणारी [[:वर्ग:मूलद्रव्ये|मूलद्रव्ये]] सापडली आहेत. यामुळे [[सूर्य]] हा जवळपास झालेल्या तारकासमूहातील स्फोटामुळे तयार झाल्याचा निष्कर्ष निघतो. या स्फोटामुळे तयार झालेली ऊर्जा ही या तेजोमेघाच्या कोसळण्याला कारणीभूत असण्याची शक्यता आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| वर्ष=२००४|शीर्षक= न्यू थियरी प्रपोज्ड फॉर सोलर सिस्टम फॉर्मेशन|लेखक= जेफ हेस्टर|कृती=अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी|दुवा= http://www.universetoday.com/am/publish/new_theory_solar_system_formation.html|अॅक्सेसदिनांक=जानेवारी ११|अॅक्सेसवर्ष = २००७}}</ref>
सूर्यमाला ज्या तेजोमेघापासून तयार झाली, त्याचा व्यास सुमारे ७००० ते २०००० खगोलीय एकके इतका होता<ref name="Arizona" /><ref name="Rawal_1985">{{cite science | last = रावळ | first = जे. जे. | month = जानेवारी | year = १९८५ | title = फर्दर कन्सिडरेशन्स ऑन कॉन्ट्रॅक्टिंग सोलर नेब्युला| journal = फिजिक्स ऍण्डअॅन्ड ऍस्ट्रॉनॉमीअॅस्ट्रॉनॉमी | volume = ३४ | issue = १ | pages = ९३-१०० | doi = 10.1007/BF00054038 | url = http://www.springerlink.com/content/r5825j48k66n8284/fulltext.pdf | format = [[Portable Document Format|पीडीएफ]] | abstract = http://www.springerlink.com/content/r5825j48k66n8284/ | accessdate= डिसेंबर २७|accessyear = २००६}}</ref>, तसेच त्याचे वस्तुमान हे सूर्यापेक्षा थोडेसे जास्त (सुमारे १-१०% जास्त) होते.<ref name="Kitamara">{{cite journal |author= Yoshimi Kitamura | coauthors = Munetake Momose, Sozo Yokogawa, Ryohei Kawabe, Shigeru Ida and Motohide Tamura | date = 2002-12-10 | title=Investigation of the Physical Properties of Protoplanetary Disks around T Tauri Stars by a 1 Arcsecond Imaging Survey: Evolution and Diversity of the Disks in Their Accretion Stage | journal = The Astrophysical Journal | volume = 581 | issue = 1 | pages = 357–380 | doi = 10.1086/344223 | url=http://www.journals.uchicago.edu/ApJ/journal/issues/ApJ/v581n1/56044/56044.text.html|accessdate=2007-01-09}}</ref> हा तेजोमेघ जेव्हा कोसळला, तेव्हा कोनीय बलामुळे त्याचा फिरण्याचा वेग वाढत गेला. जसेजसे त्याच्या केंद्रस्थानी वस्तुमान वाढत गेले, तसे त्याचे केंद्रस्थान इतर भागांपेक्षा जास्त गरम होत गेले. त्यानंतर त्या तेजोमेघावर [[गुरुत्वाकर्षण]], वायूंचा दबाव, चुंबकीय क्षेत्र तसेच फिरण्याने येणारे बल, यांचा प्रभाव वाढला व तो एका तबकडीमध्ये रूपांतरित झाला. या तबकडीचा व्यास सुमारे २०० खगोलीय एकके इतका होता<ref name="Arizona"/> तसेच त्याच्या केंद्रस्थानी एक उदयोन्मुख तारा होता.<ref>{{cite science | last = Greaves | first = Jane S. |date=2005-01-07| title = Disks Around Stars and the Growth of Planetary Systems | journal = Science | volume = 307 | issue = 5706 | pages = 68–71 | doi = 10.1126/science.1101979 | url = http://www.sciencemag.org/cgi/content/full/307/5706/68 | abstract = http://www.sciencemag.org/cgi/content/abstract/sci;307/5706/68
| accessdate = 2006-11-16}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दिनांक=2000-04-05| दुवा = http://www7.nationalacademies.org/ssb/detectionch3.html | शीर्षक = Present Understanding of the Origin of Planetary Systems | प्रकाशक = National Academy of Sciences | अॅक्सेसदिनांक = 2007-01-19 }}</ref>
== अंतर्ग्रह==
बुध व शुक्र हे दोन ग्रह अंतर्ग्रह आहेत, म्हणाजे, ते सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान आहेत. पृथ्वीच्या पलीकडे असणारे मंगळ, गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे बाह्यग्रह आहेत..
बुध शुक्र पृथ्वी व मंगळ हे चार ग्रह अंतर्ग्रह आहेत
सुर्यसूर्य हा या सगळ्या ग्रहाचाग्रहांचे स्रोतउगमस्थान आहे
== लघुग्रहांचा पट्टा ==
मंगळ व गुरु या दोन ग्रहांच्या मध्ये काही अवकाशस्थ दगड व ग्राहांसादृशग्रहांसादृश अवकाशीय वस्तू आहेत. परंतु यांचे वस्तुमान व कक्षा या ग्रहासारख्या नसल्यामुळे त्यांना लघुग्रह असे म्हणतात. या लघुग्रहांना एकत्रितपणे लाघुग्रनांचालघुग्रहांचा पट्टा असे संबोधतात.
== बाह्य ग्रह == मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून
== धूमकेतू ==
|