"विश्वनाथ भालचंद्र देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
''डॉ.'' '''वि.भा. देशपांडे''', अर्थात '''विश्वनाथ भालचंद्र देशपांडे''' (जन्म : ३१ मे, इ.स. १९३८; मृत्यू : ९ मार्च, २०१७) हे पुण्यातील [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचे]] अनेक वर्षे पदाधिकारी होते. त्यांचे बहुतांशी लिखाण मराठी नाट्यसृष्टीबद्दल आहे. त्यांनी मराठी नाट्यकोश या जवळजवळ १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात एक मोलाची भर टाकली आहे. वि.भा. देशपांडे यांची इ.स. २०१५ सालापर्यंत जवळपास ५१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पैकी नाट्यविषयक लेखनाची एकूण २५ पुस्तके आहेत.
 
‘नाटकातली माणसं’, ‘गाजलेल्या भूमिका’, ‘नाटक नावाचं बेट’ , ‘निळू फुले‘, ‘ नाट्यभ्रमणगाथा|’ , ‘निवडक नाट्यप्रवेश : पौराणिक’, ‘वारसा रंगभूमीचा’, ‘आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा’ ही त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध पुस्तके आहेत. नाटक, साहित्य, संगीत या गोष्टींवर नितांत प्रेम करणाऱ्या वि भा देशपांडे यांना आजवरच्या प्रवासात भेटलेली माणसे आणि त्यांच्याकडून आलेले अनुभव म्हणजेच त्यांचे पुस्तक ‘नाट्यभ्रमणगाथा’. नाट्य-साहित्य क्षेत्रातल्या दिग्गजांना त्यांना जवळून पाहता आले. अनेकांशी त्यांचा स्नेह, मैत्र जुळले. वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, निळू फुले, विजया मेहता, ज्योत्स्ना भोळे, भीमसेन जोशी, कमलाकर सारंग अशी अनेक मंडळी त्यांना भेटली. त्यांची नाटके, त्यांचे प्रयोग, त्यांच्या कलेची आणि व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये वि. भा. देशपांडे यांनी ओघवत्या शैलीत लिहिली आहेत. रंगभूमीच्या इतिहासातील अनेक घटना-प्रसंगही त्यांनी यातून उलगडले आहेत.
ओळ १९:
* निवडक नाट्य मनोगते (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
* निळू फुले
* मराठी एकांकी (हिंदी) - (भारतीय भाषा परिषद, कलकत्ता)
* मराठी नाटक पहिले शतक (व्हीनस प्रकाशन , पुणे)
* मराठी रंगभूमी - स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ - रंगभूमीचा इतिहास (दोन खंड) (व्हीनस प्रकाशन , पुणे)
Line २४ ⟶ २५:
* यक्षगान लोकनाटक (नवीन उद्योग प्रकाशन , पुणे)
* रायगडाला जेव्हा जाग येते : एक सिंहावलोकन (इंद्रायणी प्रकाशन , पुणे)
* [[वसंत शिंदे]] : व्यक्ती - कलावंत (श्री विशाखा प्रकाशन , पुणे)
* वारसा रंगभूमीचा
* (इ.स. १९६३ पासूनच्या) स्फुट आणि ग्रंथस्वरूपाचे लेखन
Line ७८ ⟶ ८०:
वि.भा. देशपांडे यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ दर वर्षी एका चांगल्या ग्रंथाला ‘इंदिरा-भालचंद्र पुरस्कार’ देण्यात येतो. २०१६ साली हा पुरस्कार [[रत्‍नाकर मतकरी]] यांना त्यांच्या ‘माझे रंगप्रयोग’ या पुस्तकासाठी देण्यात आला. (७-८-२०१६). दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
याआधी [[विजया मेहता]] (झिम्मा), डॉ. अजय वैद्य ([[मास्टर दत्ताराम]] : नाट्यवीर) व [[मोहन जोशी]] (नट-खट) यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.