"झाडीबोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ९७:
* १९वे, २४-२५ डिसेंबर २०११, भजेपार (अंजोरा) येथे; अध्यक्ष कवी व कथाकार राम महाजन
* २०वे झाडीबोली संमेलन, ७-८ जानेवारी २०१३, नवेबांधगाव (गोंदिया) येथे; अध्यक्ष : नीलकंठ रणदिवे
* २१वे झाडीबोली साहित्य संमेलन : ११-१२ जानेवारी २०१४, आसगाव तर्फे पवनी येथे
* २२वे झाडीबोली साहित्य संमेलन १० जानेवारी २०१५ रोजी गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा या गावी झाले. साहित्यिक धनंजय ओक या संमेलनाचे (बहुधा) अध्यक्ष असावेत.
* २४वे झाडीबोली साहित्य संमेलन जानेवारी २०१७
डोंबिवली येथे फेब्रुवारी २०१७मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी झाडीपट्टीतील साकोली येथील जनसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. विदर्भ साहित्य संघाच्या संमेलनाच्या तळोधी-बाळापूर येथील संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. मतांसाठी जोगवा मागताना डॉ. काळे यांनी काढलेल्या विनंती पत्रकात अनेकांच्या नावांसोबत झाडीबोली साहित्य मंडळाच्या अध्यक्षांचेही नाव आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. काळे यांच्या समक्ष झाडीबोलीची उपेक्षा होते ही अतिशय वेदनादायक बाब आहे. डोंबिवली संमेलनात माझे नाव सोडा, पण डॉ. राजन जयस्वाल, लखनसिंह कटरे, हिरामण लांजे, ना. गो. थुटे, डॉ. तीर्थराज कापगते यापैकी एखाद्याला तरी आमंत्रित करायला हवे होते, असे डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी नमूद केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील खास बोलींवरील परिसंवादात झाडीबोलीचा एकही प्रतिनिधी नाही. हे सारे अनवधानाने किंवा अज्ञानामुळे संबंधितांकडून घडले असावे, त्यामागे कोणताही दुष्ट अथवा वावगा हेतू नव्हता अशी वस्तुस्थिती असेल तर या चुकीच्या संदर्भात निदान दिलगिरीच्या पत्राची अपेक्षा आणि प्रतीक्षा करणे झाडीबोली चळवळीला आणि समस्त झाडीभाषकाला अयोग्य नाही ना?
- डॉ. हरिश्चंद्र बोरकर
==झाडीपट्टी परिवर्तनशील साहित्य संमेलन==
|