"सखाराम बाईंडर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
}}
 
'''सखाराम बाईंडर''' हे [[विजय तेंडुलकर ]] यांनी लिहिलेले स्त्री-पुरुष संबंधांवरचे एक [[नाटक]] आहे. हे नाटक स्त्रीवादी दृष्टिकोनातुनदृष्टिकोनातून आहे. सखाराम सखाराम बाईंडर मध्ये हाताळलेला विषय स्फोटक विषय होता. पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याचतेंडुलकरांच्या प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली.
 
[[निळू फुले]], [[लालन सारंग]] या कलाकारांनी या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. पहिला प्रयोग [[इ.स. १९७२]] मध्ये झाला. पुढे वाद-विवादांमुळे हे [[नाटक]] समाजात सतत गाजत राहिले. [[इंग्लिश भाषा|इंग्रजी भाषेत]] याचे भाषांतरही झाले [[न्यूयॉर्क]] शहरात दीर्घकाळपर्यंत या नाटकाचे प्रयोग होत राहिले.
 
नाटकाचा विषय असलेला बाइंडरबाईंडर वाईलाहा खरोखरच [[वाई]]ला राहायचा, खाणावळ चालवायचा. म्हणजे त्याने त्या वेळी ठेवलेली बाई ती खाणावळ चालवायची. तेंडुलकर या बाइंडरालाबाईंडराला भेटले होते. त्यांना तो चांगलाच लक्षात राहिला होता. तो तऱ्हेवाईकतर्‍हेवाईक होता म्हणून नव्हे, तर तो 'खरा' होता, म्हणून. ते त्याच्याविषयी बोलायचे, विचार करायचे. या तुकड्यातुकड्यांतील विचारांतून ती व्यक्तिरेखा त्यांच्या मनात आकार घेत होती.
 
एके दिवशी संध्याकाळी डॉ. श्रीराम लागू यांच्याशी बोलताना तेंडुलकरांना वाईचा हा बाइंडर आठवला. त्याच्याबद्दल लागूंशी बोलताना कल्पनेत असलेले, नसलेले अनेक तपशील स्पष्ट झाले. त्या बोलण्यातून 'सखाराम बाइंडरबाईंडर' ही व्यक्तिरेखा जन्माला आली. तो नाटकात बोलणार असलेली अनेक वाक्ये तेंडुलकरांना ऐकू येऊ लागली. त्याच रात्री तेंडुलकरांनी नाटकाचा पहिला अंक एकटाकी लिहून काढला.
 
तेंडुलकरांचे हे नाटक श्री. कमलाकर सारंग यांनी दिग्दर्शित केले. नाटक रंगमंचावर आले आणि एकच गदारोळ झाला. नाटक पाहिलेल्यांनी, आणि त्याहीपेक्षा न पाहिलेल्यांनी 'या नाटकात अश्लीलता आहे', 'या नाटकामुळे विवाहसंस्था धोक्यात आली आहे', 'हे नाटक भारतीय संस्कृतीला काळिमा फासणारे आहे', असा ओरडा करायला सुरुवात केली. तेंडुलकरविजय या व्यक्तीच्यातेंडुलकरांच्या विचारांना असलेला काहींचा आधीपासूनचा विरोध यावेळी उफाळून आला.
 
नाटकाचे तेरा प्रयोग झाल्यानंतर सेन्सॉरने या नाटकावर बंदी आणली. या बंदीविरुद्ध नाटकाचे दिग्दर्शक श्री. कमलाकर सारंग कोर्टात गेले, आणि आठ महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर केस जिंकले. 'सखाराम बाइंडरबाईंडर'चे प्रयोग पूर्ववत सुरू झाले असे वाटत असतानाच, काही राजकीय पक्षांनी झुंडशाहीच्या जोरावर प्रयोग बंद पाडले. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हे नाटक संमत करून घेतल्यावरच पुढचे प्रयोग होऊ शकले.
 
निळू फुले आणि लालन सारंग यांनी १९७२ साली या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. त्यानंतर सयाजी शिंदे आणि सोनाली कुलकर्णी यांनी द्वनिचित्रपुतीसाठी हे नाटक केले होते.
 
या नाटकाचा हा भन्नाट प्रवास कमलाकर सारंग यांनी 'बाइंडरचे दिवस' या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे.
 
==ललित कला केंद्राचा प्रयोग==
२००१ साली ललित कला केंद्रामध्ये शिकत असताना तेथील २०-२२ वर्षाच्या मुलांनी स्टुडंट्स प्रॉडक्शन अंतर्गत सखाराम बाईंडर हे नाटक बसविले होते. या नाटकाचे त्यावेळी दोनच प्रयोग झाले होते. एक पुण्यात आणि दुसरा दिल्लीमध्ये. पुन्हा त्याच टीमसोबत २०१७ साली, हे स्त्री-पुरूष संबंधांचे करकरीत वास्तव मांडत समाजाला धक्का देणारे, विख्यात नाटककार विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक परत रंगभूमीवर येणार आहे. यावेळी नाटकाचे १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी असे दोनच प्रयोग होणार आहेत. नाटकात [[मुक्ता बर्वे]], संदीप पाठक, सुहास शिरसाट, यांच्या भूमिका असतील.
 
 
[[वर्ग:विजय तेंडुलकरांचे साहित्य]]