"रामचंद्र चितळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''रामचंद्र नरहर चितळकर''' ऊर्फ '''सी. रामचंद्र''' ([[१२ जानेवारी]], [[इ.स. १९१८]] - [[५ जानेवारी]], [[इ.स. १९८२]]) हे भारतीय चित्रपट संगीतकार होते. चित्रपट निर्माते जयंत देसाई यांनी रामचंद्र ऊर्फ अण्णा चितळकरांना ‘सी रामचंद्र’ हे नाव दिले.
==कारकिर्दीची सुरुवात==
रामचंद्र चितळकरांना खरे तर नट व्हायचे होते. अभिनयाचे वेड घेऊन ते मुंबईत आले होते आणि नाईलाजाने एक्स्ट्रा कलाकार म्हणून स्थिरावले होते. तेही काम मिळेनासे झाल्यावर ते थेट चित्रपट निर्माते [[सोहराब मोदी]]ना भेटले. पडेल ते काम करायची त्यांनी तयारी दाखवली, तेव्हा मोदींनी चितळकरांना मीरसाहेब नावाच्या त्याकाळच्या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाकडे पाठवले.
==स्वरलिपी आणि गायन==
मीरसाहेबांना स्वरलिपी येत नव्हती आणि गाताही येत नव्हते. त्यामुळे सुचलेली चाल लिहून ठेवता येत नव्हती आणि गायकांना गाऊनही दाखवता येत नव्हती. या दोन्ही गोष्टी चितळकरांना येत होत्या. त्यामुळे मीरसाहेब आपल्या नवीन साहाय्यकावर खुश झाले.
==पाश्चात्त्य संगीताशी परिचय==
मीरसाहेबांकडे असताना चितळकरांची ओळख पाश्चात्त्य वाद्यांवर हिंदुस्थानी संगीत वाजवून दाखवणार्या ‘हूगन’ नावाच्या संगीत कलाकाराशी झाली. त्यांच्या संगतीने चितळकरांनी मुंबईच्या मोठमोठ्या हॉटेलांतून इंग्लिश वादकांचे वादन ऐकले. पश्चिमी संगीतातली उडती लय देशी गाण्यांना देता आली तर ती गाणी खूप लोकप्रिय होतील, ह्याचा अंदाज अण्णांना त्यावेळी आला.
==भगवानदादांशी संबंध==
दिग्दर्शक मास्टर भगवान आबाजी पालव ऊर्फ भगवानदादा त्या काळात गल्लाभरू चित्रपट देणारे यशस्वी दिग्दर्शक समजले जात. भगवान अनेकदा मीरसाहेबांमुळे खोळंबत असत. असेच एकदा मद्रासला एक काम अडकल्याने मीरसाहेब भगवानना म्हणाले, 'आपण राम चितळकरला-अण्णांना बोलावून घेऊ. अण्णा ती सगळी कामे पटकन करतील...' नंतर अण्णा मद्रासला गेले आणि पटापट स्वरलिपी-लिखाण करून त्यांनी अडकलेले काम पुढे नेले. भगवानदादांना चितळकर खूप आवडले आणि त्या दोघांची मैत्री झाली.
==सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेले हिंदी चित्रपट==
|