"वीणा सानेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. वीणा सानेकर या मराठी भाषेच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी झटण... |
No edit summary |
||
ओळ १:
प्रा. डॉ. वीणा सानेकर या मराठी भाषेच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी झटणार्या एक मराठी लेखिका आहेत. त्या मराठी अभ्यास केंद्राअंतर्गत असलेल्या 'मराठी विद्याजगत' या गटाच्या प्रमुख आहेत.
८ डिसेंबर २०१० रोजी मराठी अभ्यास केंद्र, ग्राममंगल, शिक्षण हक्क समन्वय समिती, समर्थ भारत व्यासपीठ आणि मराठी एकजूट या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 'लढा मराठी शाळांचा' ही महाराष्ट्र-राज्यव्यापी परिषद घेण्यात आली होती. या परिषदेच्या निमित्ताने प्रा. वीणा सानेकर यांची ' लढा मराठी शाळांचा ' ही पुस्तिकादेखील प्रकाशित करण्यात आली. ह्या पुस्तिकेबाबत आणि एकूणच मराठी शाळांच्या सद्यस्थितीबद्दल आणि त्यांच्या सक्षमीकरणाबद्दल तसेच समाजाच्या बदलत्या मानसिकतेतही मराठी शाळांच्या गरजेबद्दल प्रा. वीणा सानेकर यांनी भारतीय दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ३ मे २०११ रोजी झालेल्या मुलाखतीत आपले मत तसेच मराठी अभ्यास केंद्राची भूमिका मांडली होती.
मानकरकाकांच्या आठवणी सांगणारे ’[[मानकरकाका]]’ हे पुस्तक बोरीवलीच्या ’फुलराणी’ प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. पुस्तकाचे लेखन काकांचे विद्यार्थी राज कांबळे आणि टॉनिक परिवारातील लेखकांनी आणि चित्रकारांनी केले आहे. डॉ. वीणा सानेकर व राजेश दाभोळकर या लेखसंग्रहाचे संपादक आहेत.
|