"पुणेरी पगडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
[[चित्र:Bal Gangadhar Tilak crop.jpg|इवलेसे|उजवे|पुणेरी पगडी घातलेले लोकमान्य टिळक]]
'''पुणेरी पगडी''' हा एक [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] पगडीचा (डोक्यावर घालायच्या वस्त्राचा) प्रकार आहे. या पगडीचा उगम [[पेशवाई]]च्या काळात झाला. महाराष्ट्रातील [[न्यायमूर्ती रानडे]], [[लोकमान्य टिळक]], [[गोपाळ कृष्ण गोखले]], [[गोपाळ गणेश आगरकर]], इत्यादी विद्वान व्यक्ती ही पगडी घालत असत. त्याकाळी आणि आजही पुण्यात पगडी हे मानाचे प्रतीक आहे. पगडीची ओळख कायम
==पगडीचे भाग==
पुणेरी पगडीच्या वरच्या भागाला माथा म्हटले जाते. उजव्या बाजूला असणारा उंच भाग म्हणजे कोका आणि त्याचे टोक म्हणजे चोच. पगडीचे देखणेपण हे या चोचीवर उवलंबून असते. चोचीला असलेला गोंडा म्हणजे जरतार. पगडीच्या कडेच्या पट्टीला घेरा म्हटले जाते. घेर्याखाली कपाळावर येणार्या भागाला कमल, तर आतील भागाला गाभा म्हटले जाते. पगडीवर केलेले जवाहिरी काम, जरतार यांवर तिची किंमत ठरत असे.
== इतिहास ==
१९व्या
== वापर ==
आजच्या काळात पगडीचा वापर उत्सव सोहळ्यांमध्ये व शाळा, महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक दिन साजरा करताना केला जातो. तसेच देवीचा गोंधळ करतानाही तिचा वापर होतो. पुण्याच्या कलेचे प्रतीक म्हणून नाटकांमध्ये व चित्रपटांमध्ये पुणेरी पगडीचा वापर अनेकदा दाखवण्यात येतो.
सध्या तयार स्वरूपात मिळणारी पुणेरी पगडी ही पूर्वी कापड घेऊन बांधली जायची. माती किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा डोक्याच्या आकाराचा साचा बनवला जायचा. त्या साचावर कोष्टी म्हणजे विणकर समाजातील कारागीर दर पंधरा दिवसांनी घरोघरी जाऊन पगडी बांधून द्यायचे. सुती कापडाची लाल रंगाची पट्टी, त्याला बत्ती कापड असे म्हटले जायचे, ती कांजीत बुडवून त्याची घट्ट बांधलेली पगडी पंधरा दिवस टिकायची. या कापडामुळेच लाल रंग ही देखील ओळख या पगडीला मिळाली.
बाजाराच्या मागणीनुसार रंग, कापड यांत आता (२०१७ साली) फरक पडला आहे. पगडी तयार करण्याची पद्धतही बदलली आहे. मात्र त्याचे मूळ स्वरूप टिकवून ठेवले आहे. पुण्यातील मुरूडकर झेंडेवाले हे तीन पिढ्यांपासून पगडीची परंपरा जपत आले आहेत. आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या साच्यावरून कागदी लगद्याचा साचा तयार केला जातो आणि त्यावर कापड, स्पंज वापरून पगडी तयार केली जाते व तिला आतून अस्तर लावले जाते. रेशीम किंवा सॅटिनच्या पगडीला अधिक मागणी असते. भगवी, जांभळी, राणी कलर, मोतिया अशा अनेक रंगात पगडी तयार केली जात असली तरीही त्याच्या मूळ लाल रंगाकडेच ग्राहकांचा ओढा आहे.
गणेशोत्सवात गणेशमूर्तीला घालण्यासाठी, पांडुरंगाच्या मूर्तीसाठीही पगडी तयार केली जाते.
पहा : [[पाग]], [[पागोटे]], [[मुंडासे]], [[चक्राकार पगडी]], [[साफा]]
|