"अर्जुन वृक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १४:
* इंग्रजी-
* लॅटिन-Serculiaurens/Terminalia tomentosa
==अर्जुनाच्या विविध नावांचे अर्थ==
* अर्जुनाचे झाड वयात आले की एखाद्या दधीची ऋषींसारखी, त्याची साल आपोआप गळून पडते. मानवाच्या आरोग्यासाठी ती देवासारखी उपयोगी पडते म्हणून त्या झाडाला देवसाल, शक्रतरू, इन्द्रू अशी इंद्राची नावे आहेत.
* नदीकाठी अर्जुनाची चांगली वाढ होते म्हणून याला नदीसर्ज असे नाव आहे.
* पार्थ, धनंजय या पांडवपुत्र अर्जुनाच्या नावांवरून अर्जुनवृक्षालाही ती नावे पडली.
* अनेक वृक्षांपासून चीक मिळतो. पण अर्जुनवृक्षाचा गोंद (चीक) हा सुंदर, पारदर्शक, स्वच्छ, बल्य व पौष्टिक आहे. त्यामुळे अर्जुनवृक्षाला क्षीरस्वामी असे नामाभिधान प्राप्त झाले आहे.
* ककुभ् म्हणजे दिशा. ज्याचा पसारा सर्व दिशांना पसरलेला आहे, म्हणून अर्जुनसादडाला ककुभ म्हणतात.
* ज्याचे बुद्धिपुरस्सर सेवन केले जाते, अशा त्याला सेव्य असे नाव मिळाले.
* पांढर्या रंगाला अर्जुन हा एक प्रतिशब्द आहे, म्हणून ज्याची साल बाहेरून पांढरी दिसते, म्हणून त्याला अर्जुन हे नाव पडले असावे. वगैरे वगैरे.
===वर्णन===
अर्जुनाची साल पांढरट, किंचित लालसर वर्णाची असते. अर्जुनाच्या सालीचा चटकन तुकडा पडतो. त्यात तंतुमय रेषा नसतात. त्यामुळे त्याचे चूर्ण एकदम गुळगुळीत शंखजिरे चूर्णासारखे असते. अर्जुन वृक्ष ६० ते ८० फूट उंच असणारे तपस्वी ऋषींसारखे उभे असतात. मध्य प्रदेशात अर्जुन वृक्ष हा संरक्षित वृक्ष म्हणून वनखात्याच्या अनुज्ञेविना तोडता येत नाही. विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात अर्जुनाचे वृक्ष खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. अर्जुनाला पंख्यासारखी छोटी फळे वा बिया असतात. त्या रुजवून त्यांची रोपे सहज करता येतात. अर्जुनाची झाडे नदी, ओढे यांच्या काठावर उतारावर लावल्यास अधिक चांगली रुजतात. अर्जुनाची सालच प्रामुख्याने औषधी प्रयोगाकरिता वापरली जाते. वजनाने ती हलकी असते, अशी ही साल तुरट रसामुळे घट्ट बनलेली असते. अर्जुनाचा डिंकही पौष्टिक, हृदयाला बल देणारा आहे.
===उत्पत्तिस्थान===
Line २१ ⟶ ३३:
===उपयोग===
'''आयुर्वेदानुसार''' अर्जुनाची साल हृदयरोगावर गुणकारी आहे. <br>
==आराध्यवृक्ष==
हा [[स्वाती]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.
==अर्जुन वृक्षासंबंधी विविध ग्रंथांतील उल्लेख==
* अर्जुनस्य त्वचा सिद्धं क्षीरं योज्यं हृदामये। ... (चक्रधर हृद्रोग चि/ १०)
* श्वेतवल्कलवान् वृक्षः पुष्पं नेत्राञ्जनेउपयुज्यते।...(सुश्रुत उत्तरस्थानम् १२.११)
===संदर्भ===
|